अयोध्या ; पुढारी ऑनलाईन या वर्षी २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या येथे भव्य राम मंदिरात श्री रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली. ज्यानंतर येथे भक्तांची गर्दी होउ लागली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले की, प्राणप्रतिष्ठेनंतर आतापर्यंत जवळपास दीड कोटी लोकांनी राम लल्लाचे दर्शन घेतले आहे.
चंपत राय यांनी सांगितले की, दर दिवशी एक लाखाहून अधिक भाविक मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. २२ जानेवारी रोजी 'प्राण प्रतिष्ठे' नंतर आतापर्यंत जवळपास दीड कोटी लोकांनी राम लल्लाचे दर्शन घेतले आहे. आज २२ एप्रिल रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला तीन महिने पूर्ण झाले आहेत.
सध्या मंदिराचा केवळ खालचा मजलाच पूर्ण झाला आहे. ज्या ठिकाणी राम लल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली होती. पहिल्या मजल्याचे काम चालू आहे. मंदिराच्या चारही बाजुंना १४ फूट उंच सुरक्षा भिंत उभारण्यात येणार आहे. या भिंतीला 'परकोटा' म्हंटले जाते.
हेही वाचा :