Latest

श्रद्धा वालकर खून : आफताबची नार्को चाचणी सोमवारी | (Aaftab’s narco test on Monday

मोहसीन मुल्ला

दिल्ली, पुढारी ऑनलाईन : श्रद्धा वालकर खून प्रकरणातील संशयित आफताब आमिन पुनावाला याची सोमवारी नार्को टेस्ट केली जाणार आहे. यासाठी आफताबची शारीरिक चाचणी झाली असून तो फीट असल्याचा सूत्रांनी सांगितले. (Aaftab narco test)

लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरचा खून करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे केल्याच्या आरोपाखील आफताबला पोलिसांनी अटक केली आहे. आफताबची पॉलिग्राफ चाचणी पूर्ण झालेली आहे. श्रद्धाच्या खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी न्यायालयाने आफताबची नार्को आणि पॉलिग्राफ चाचणीची परवानगी दिलेली आहे.

नार्को टेस्ट कशी करतात?

नार्को टेस्ट करण्यासाठी भुलीची औषधे वापरले जातात. हे इंजेक्शन दिल्यानंतर संबंधित व्यक्ती शुद्धीवर नसतो. पण विचारलेले प्रश्न ऐकू शकतो आणि त्याची उत्तरे देऊ शकतो. आरोपी शुद्धीवर नसल्याने तो खरी उत्तरे देतो. शरीराच्या वजनाच्या प्रमाणावर इंजेक्शनची मात्रा ठरते. ही चाचणी करण्यासाठी व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक स्थिती चांगली असावी लागते.
आफताबची पॉलिग्राफ चाचणीत गुरुवारी झाली आहे. पॉलिग्राफ चाचणीत आफताबाला ५० प्रश्न विचारण्यात आले, गुन्ह्यातील वापरलेल्या शस्त्रांबद्दल आफताबने माहिती दिलेली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT