Latest

Pushpa 2 The Rule : बदला घ्यायला येत आहे भंवर सिंह! फहाद फाजिलचा सेटवरून फोटो व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा' चित्रपट सुपरहिट ठरला होता. अल्लू अर्जुन ते रश्मिका मंदाना आणि फहाद फाजिलने दमदार अभिनयाने सर्वांचे मन जिंकले होते. (Pushpa 2 The Rule ) आता या चित्रपटाचा दुसरा भाग 'पुष्पा २' येणार असून सेटवरून एक फोटो समोर आला हे. हा फोटो फहाद फाजिलचा असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फहादने चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्याचसोबत निर्मात्यांनी मोठं अपडेट दिलं आहे. (Pushpa 2 The Rule)

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पाचे वेड अजूनही प्रेक्षकांना आहे. पुष्पा चित्रपटामध्ये अल्लू अर्जुनच्या शानदार अभिनयाने सगळीकडे त्याची वाहव्वा होत आहे. परंतु, चित्रपटाच्या शेवटी १५ मिनिटांमध्ये एका आयपीएस अधिकारी भंवर सिंह शेखावत याच्या धमाकेदार एन्ट्रीने पूर्ण कहाणीचं बदलली होती. पुष्पा या चित्रपटाचा आयपीएस अधिकारी आहे भंवर सिंह शेखावत अर्थातच अभिनेता फहाद फाजिलने ही भूमिका साकारली होती. फहादचा सेटवरून फोटो रिलीज झालाय. ज्यामद्ये तो शूटिंग कॅमेऱ्याच्या स्क्रिनमध्ये पाहत आहे. हा फोटो पाहून नेटकरी प्रतिक्रिया देत आहे. एका सोशल मीडिया युजरने म्हटले आहे-'बदला घ्यायला येत आहे भंवर सिंह.'

अभिनेता फहाद फासिलने मल्ल्याळम आणि तमिळमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

कोण आहे फहाद?

फहादने आपल्या चित्रपट करिअची सुरुवात २००२ मध्ये 'कायेथुम दुराथ' चित्रपटातून केली होती. पण, हा चित्रपट दुर्दैवाने फ्लॉप ठरला. चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्याने आपला अभिनय सोडून शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. फहाद अमेरिकेला गेला. तेथे त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. याचदरम्यान, पुन्हा एकदा त्याने अभिनय क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला.

पुष्पा पार्ट-२ मध्ये जोरदार टक्कर

पुष्पा पार्ट-२ मध्ये फहाद आणि अल्लू अर्जुन म्हणजेच आयपीएस अधिकारी शेखावत-अल्लू अर्जुन यांच्यामध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळेल. चित्रपटाच्या पुष्पा पार्ट-२ ची फॅन्स मोठी प्रतीक्षा करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT