Latest

Shooting In Alabama : अमेरिकेमधील अलाबामात वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबार, एका फुटबॉलपटूसह ४ ठार; २८ जखमी

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेमधील अलाबामाच्या डेडविले या छोट्याशा गावातील डान्स स्टुडिओमध्ये गोळीबार झाला. गोळीबार वाढदिवसाच्या पार्टीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या गोळीबारात एका हायस्कूल फुटबॉलपटूसह चारजण ठार झाले आहेत. तर २८ जण जखमी झाले आहेत. राज्य पोलिस आणि स्थानिक प्रसारमाध्यमांनी याबाबत माहिती दिली. (Shooting In Alabama)

पोलिसांच्या माहितीनूसार, मॉन्टगोमेरी राज्याच्या राजधानीच्या ईशान्येस सुमारे १०० किमी अंतरावर पूर्व-मध्य अलाबामा येथील महोगनी मास्टरपीस डान्स स्टुडिओमध्ये हा गोळीबार झाला. येथे वाढदिवसाच्या पार्टीच आयोजन करण्यात आले होते. रात्री १०.३० नंतर हा गोळीबार झाला. हा गोळीबार एवढा अंधाधुंद होता की, एका हायस्कूल फुटबॉलपटूसह चारजण ठार झाले आहेत. तर २८ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काही गंभीर जखमी झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बंदुकीचा हिंसाचार कशामुळे झाला याबद्दल अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही.

Shooting In Alabama : त्याला फुटबॉल शिष्यवृत्ती घ्यायची होती

मॉन्टगोमेरी अॅडव्हर्टायझर वृत्तपत्राच्या वृत्तानूसार, या गोळीबारात मारल्या गेलेल्या चार लोकांपैकी एक हा हायस्कूल फुटबॉल खेळाडू होता. तो आपल्या बहिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित होता. त्याच्या आजीने माध्यमांना सांगितले की, तो येत्या काही दिवसांत त्याचे शिक्षण पूर्ण होणार होते आणि तो फुटबॉल शिष्यवृत्तीवर जॅक्सनविले स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये जाणार होता. रॉयटर्सच्या वृत्तानूसार  इतर तीन बळींची ओळख पटलेली नाही.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT