Latest

Shiv Sena News: ठाकरे गटाचे नेते अनिल देसाईंची गुन्हे शाखेकडून ८ तास चौकशी; काय आहे प्रकरण?

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आले होते. यानुसार आज (दि.५)  ते मुंबई पोलीस मुख्यालयात चौकशीसाठी हजर राहिले. दरम्यान त्यांची तब्बल ८ तास चौकशी झाली. यानंतर ते मुख्यालयातून बाहेर पडतानाचा व्हिडिओ ANI वृत्तसंस्थेने एक्स अकाऊंटवरून शेअर केला आहे. (Shiv Sena News)

शिवसेना पक्षाच्या निधीसंदर्भात शिंदे गटाच्या शिवसेनेने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत, आर्थिक गुन्हे शाखेने शिवसेना पक्षाच्या निधी खात्यासंदर्भातील चौकशी सुरू केली आहे. वडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचं जाहीर केल्यानंतर पक्षनिधी खात्यातील पन्नास कोटी रुपये काढल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाने ठाकरेंवर तक्रार दाखल केली होती. (Shiv Sena News) शिंदे शिवसेनेच्या आरोपाबाबत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) अनिल देसाईं यांना चौकशीसाठी बोलावले होते. दरम्यान आज (दि.५) देसाई यांची आठ तास चौकशी करण्यात आली. (Shiv Sena News)

…त्यांना आवश्यक ते सगळं सांगितलं; चौकशीनंतर देसाईंची पहिली प्रतिक्रिया

"त्यांनी मला जे काही विचारलं ते मी त्यांना सांगितलं. मला वाटतं की मी त्यांना आवश्यक ते सगळं सांगितलं असल्याची प्रतिक्रिया अनिल देसाई यांनी चौकशी नंतर माध्यमांशी बोलताना दिली आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT