BJP Rally in Jalgaon : पवार-ठाकरे कुटुंबांकडून केवळ घराणेशाहीचे राजकारण : अमित शहांचा हल्‍लाबाेल | पुढारी

BJP Rally in Jalgaon : पवार-ठाकरे कुटुंबांकडून केवळ घराणेशाहीचे राजकारण : अमित शहांचा हल्‍लाबाेल

पुढारी ऑनलाईन डेस्क: सोनिया गांधी यांना राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान बनवायचे आहे. शरद पवार यांना त्यांच्या मुलीला, ठाकरेंना आदित्य ठाकरेंना, पं. बंगालमध्ये ममता बॅनर्जींना त्यांच्या भाच्याला तर स्टॅलिनला आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचे आहे. देशातील विरोधी पक्ष अशाप्रकारे केवळ घराणेशाहीचे राजकारण करत आहेत, अशा शब्दांमध्‍ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी INDIA आघाडीवर घणाघाती हल्ला केला. या देशाचा विचार केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. त्यामुळे आपल्याला यावेळी तिसऱ्यांदा पीएम मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे, असे आवाहन समुदायाला केले आहे. जळगाव येथे आयोजित भाजप युवा संमेलन सभेत ते आज (दि.५) बोलत होते. (BJP Rally in Jalgaon)

BJP Rally in Jalgaon: नरेंद्र मोदी यांनी भारताला आत्मनिर्भर बनवले

यावेळी अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्‍या नेतृत्त्‍वाखाली देशाचा विकास कसा झाला याची माहिती देताना सांगितले की, आगामी लाेकसभा निवडणुकीत विराेधी पक्ष केवळ घराणेशाही जिंवत ठेवण्‍याच्‍या धडपडीत आहे.  काही पक्ष केवळ परिवारवादावर चालतात. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला आत्मनिर्भर बनवले. त्‍यांच्‍या कार्यकाळात देशाची अर्थव्‍यवस्‍था तिसर्‍या स्‍थानावर झेपावली. सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे, असेही ते म्‍हणाले. (BJP Rally in Jalgaon)

मविआची पंक्चर रिक्षा विकास करू शकत नाही- अमित शहा

पवारांनी गेल्या ५० वर्षात काय केलं? याचा त्यांनी हिशोब द्यावा. मी गेल्या १० वर्षाचा हिशोब तुम्हाला देतो, असा थेट हल्लाबोल शरद पवारांवर केला आहे. गेल्या दोन लोकसभेत राहुल गांधी यांचे यान लँड झाले नाही. यावेळी राहुल गांधी तिसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न करत आहे, अशी मिश्किल टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केली. मविआच्या तीन चाकी रिक्षाचे टायर पंक्चर झाले आहे. त्यामुळे पंक्चर रिक्षा विकास करू शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच महाराष्ट्राचा विकास करू शकेल,असे शहा यांनी स्पष्ट केले. (BJP Rally in Jalgaon)

लोकशाही मजबूत करणाऱ्या पक्षांना मत द्या; शहांचे नवमतदारांना आवाहन

गेल्या १० वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंतराळापासून सेमी-कंडक्टरपर्यंत, डिजिटलपासून ड्रोनपर्यंत, AI पासून वॅक्सिनपर्यंत आणि 5G पासून फिनटेकपर्यंत प्रत्येक क्षेत्रात तरुणांसाठी दरवाजे उघडण्याचे काम केले. तुमच्यापैकी जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत, मी खास करून त्या तरुण मित्रांना सांगायला आलो आहे की, तुम्ही त्या पक्षाला, नेत्याला मत द्या, जो भारत मातेला जागतिक स्थानावर आणू शकेल आणि एक महान भारत घडवू शकेल. “लोकशाही मजबूत करणाऱ्या पक्षांना मत द्या”, असेही आवाहन गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील नवमतदारांना केले.

PM मोदींकडे पुढील २५ वर्षाचे मिशन

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे १० वर्षाचा हिशोब आणि पुढील २५ वर्षाचे मिशन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी भविष्यातील भारतासाठी सज्ज आहेत. 2030 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणे, 2035 पर्यंत अंतराळ स्टेशन स्थापन करणे, 2036 मध्ये ऑलिम्पिकचे आयोजन आणि 2040 मध्ये एका भारतीयाला चंद्रावर पाठवून मून मिशन पूर्ण करण्याचा प्लॅन पीएम मोदींकडे आहे. त्यामुळे पीएम मोदींना तिसऱ्यांदा संधी दिल्यास मोदी अर्थव्यवस्था तिसऱ्या नंबरवर नेतील, असा विश्वास देखील शहा यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान भाजपला ४०० पार करण्याचे आवाहन देखील अमित शहा यांनी या सभेदरम्यान केले. 

हेही वाचा:

Back to top button