Latest

Shiv Jayanti 2024 : उद्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण देणार; मुख्यमंत्र्यांची शिवनेरीवरून घोषणा

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणार आणि टिकणार मराठा आरक्षण देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किल्ले शिवनेरीवरून केली. (Shiv Jayanti 2024)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर आज शिवजन्मोत्सव सोहळा झाला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते.

संबंधित बातम्या : 

शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं राज्य आपल्याला सुराज्य करायच आहे. म्हणूनच महाराजांचा आदर्श ठेवून काम करत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या विशेष अधिवेशन घेतलं आहे. ओबीसी किंवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देण्यासाठी खास अधिवेशन उद्या आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. (Shiv Jayanti 2024)

Shiv Jayanti 2024 : 'छत्रपती शिवाजी महाराज व्यक्ती नव्हे तर विचारसरणी'

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, १८ पगड जातीचे लोक महाराजांनी एकत्र आणले. महाराजांनी तलवार हाती घेतली, पण ती कधी निष्पाप लोकांच्या रक्ताने रंगू दिली नाही. त्यामुळे त्यांच्या रणनितीला रक्ताचा वास नाही, तर मानवतेचा सुगंध येतो. छत्रपती शिवाजी महाराज व्यक्ती नव्हे तर विचारसरणी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT