Latest

शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय: राज्यात ‘मुख्यमंत्री किसान योजना’ सुरु करणार

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता राज्यातही 'मुख्यमंत्री किसान योजना' लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. या योजनेअंतर्गंत प्रत्येक वर्षी राज्यातील शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. कृषी विभागाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून येत्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ हजार अनुदान जमा करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही योजना सुरु करण्यात येणार आहे. टप्प्या टप्प्याने ही रक्कम खात्यावर जमा केली जाणार आहे.
या योजनेसाठी अर्थसंकल्पात किती रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे, याबाबतचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. तसेच या योजनेसाठी पात्र शेतकरी ठरविण्यासाठी कोणते निकष लावणार याबाबतही स्पष्टता नाही. दरम्यान, कृषी विभागाच्या बैठकीत यावर चर्चा झाल्याचे सांगतिले जात आहे.

हेही वाचलंत का ?

SCROLL FOR NEXT