पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री हुमा कुरैशी आणि सोनाक्षी सिन्हा यांचा आगामी चित्रपट 'डबल एक्सएल' सध्या चर्चेत आहे. ही दोन प्लस-साईज महिलांची कहाणी आहे, ज्या आपल्या स्वप्नांच्या शोधात आहेत. (Double XL) सतराम रमानीद्वारा दिग्दर्शित स्लाईस-ऑफ-लाईफ कॉमेडी ड्रामा आहे. शरीराचे वजन कितीही असो पण, हा दृढ संदेश देतो की, जर आपण कोणते स्वप्न पाहता तर ते मिळवूही शकता. (Double XL)
नवी दिल्ली, मेरठ आणि मुंबईच्या वातावरणात रचलेला या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा-हुमा कुरैशी सोबत जहीर इकबाल, महत राघवेंद्रदेखील दिसणार आहे. पण खास बाब म्हणजे, चित्रपटातील आणखी एका मोठ्या सरप्राईजचा खुलासा होणार आहे. प्रसिध्द क्रिकेटर शिखर धवनदेखील 'डबल एक्सएल' मध्ये खूप खास अंदाजात दिसणार आहे.
या चित्रपटाबाबत शिखर सांगताे की, चित्रपटात काम करण्याचा निर्णय अगदी सहजपणे घेतला. तो म्हणतो की, 'देशासाठी खेळणारा एक ॲथलीट म्हणून जीवन नेहमी खूप बिझी असते. चांगली मनोरंजक चित्रपट पाहणं मला आवडतं. जेव्हा ही संधी माझ्याजवळ आली आणि मी कहाणी ऐकली, तेव्हा याचा माझ्यावर खूप खोल परिणाम झाला. हा संपूर्ण समाजासाठी एक प्रेमळ संदेश आहे आणि मला आशा आहे की, अनेक तरुण-तरुणी आपल्या स्वप्नांचा शोध घेत राहतील.बल एक्सएल ४ नोव्हेंबर रोजी रिलीज होईल. चित्रपटात गुलशन कुमार, टी-सीरीज, वाकाओ फिल्म्स आणि मुदस्सर अजीजद्वारे प्रस्तुत आहे.
हेही वाचा :