Latest

Captain Shikar Dhawan : शिखर धवनच्‍या नावावर अनोखा विक्रम नोंद; अशी कामगिरी करणारा ठरला पहिला कर्णधार

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कर्णधार शिखर धवन यांच्‍या नेतृत्‍वाखाली टीम इंडियाने वेस्‍ट इंडिजविरुद्‍धच्‍या पहिल्‍या वन डे सामन्‍यात ३ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. अखेर षटकापर्यंत उत्‍सुकता ताणलेल्‍या या सामन्‍यात कर्णधार शिखर धवन ( Captain Shikar Dhawan )याने आपल्‍या दमदार खेळीने त्‍याच्‍या चाहत्‍यांसह क्रिकेटप्रेमींना मंत्रमुग्‍ध केले. ही खेळी केल्‍याने त्‍याच्‍या नावार एका अनोख्‍या विक्रमाची नोंद झाली आहे. या सामन्‍यात शिखरने आपल्‍या नेतृत्‍वाची चुणकही दाखवली.

Captain Shikar Dhawan : अशी कामगिरी करणारा दुसरा कर्णधार

शनिवारी झालेल्‍या सामन्‍यात शिखर धवनने अशी कामगिरी केली की, त्‍याने २३ वर्षांपूर्वीचा मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम मोडीत काढला. शिखरने ९७ धावांची स्‍मरणीय खेळी केली. या कामगिरीमुळे तो सर्वाधिक वयाचा अर्धशतक करणारा भारतीय कर्णधार झाला आहे. तसेच ९० धावांनंतर सर्वाधिक वेळा बाद होणारा विराट कोहलीलाही त्‍याने मागे टाकले आहे.

मोहम्‍मद अझरुद्दीन होता अर्धशतक झळकवणारा सर्वाधिक वयाचा कर्णधार

अझरुद्दीन याने ८जून १९९९ मध्‍ये कर्णधार असताना अर्धशतकी खेळी केली होती. यावेळी त्‍याचे वय ३६ वर्ष १२० दिवस होते. त्‍याने मॅनचेस्‍टरमध्‍ये पाकिस्‍तानविरोधात विश्‍वचषक स्‍पर्धेत ५९ धावांची खेळी केली होती. आता धवन याने ३६ वर्ष २२९ दिवस वय असताना अर्ध शतकी खेळी केली आहे.

नर्व्हस 90 मध्‍ये शिखर सहावेळा बाद…

शनिवारच्‍या सामन्‍यात शिखर धवन हा ९७ धावांवर बाद झाला. ९० धावानंतर शतकाला गवसणी घालण्‍यात त्‍याला पुन्‍हा एकदा अपयश आले. ९० ते ९९ या धावांवर खेळताना (नर्व्हस 90 ) तो सहावेळा बाद झाला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर हा 'नर्व्हस 90' मध्‍ये तब्‍बल १७ वेळा बाद झाला आहे. तर सौरव गांगुली हा ६ वेळा बाद झाला आहे. आता विराट आणि सेहवागपेक्षाही 'नर्व्हस 90'मध्‍ये शिखर अधिकवेळा बाद झाला आहे. विराट आणि सेहवाल हे 'नर्व्हस 90'मध्‍ये पाचवेळा बाद झाले होते.

तीन वर्षांनंतर होता शतक झळकविण्‍याची संधी

शिखर धवनला शनिवारी तीन वर्षांनंतर शतक झळकविण्‍याची संधी मिळाली होती. त्‍याने दमदार ९७ धावांची खेळी केली. मात्र तो शतकी खेळीपासून लांबा राहिला. यापूर्वी शिखर याने २०१९ विश्‍वचषक सामन्‍यात शतकी खेळी केली होती.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT