Latest

shashikant shinde : माझी शिफारस कमी पडल्याने शिवेंद्रराजे अध्यक्ष होऊ शकले नाहीत

backup backup

सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीवेळी बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिवेंद्रराजेंच्या नावाची मीच पवार साहेबांकडे शिफारस केली होती. त्यामुळे ते अध्यक्ष झाले होते;  पण यावेळेस जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माझाच पराभव झाल्याने माझ्या सारख्याची शिफारस कमी पडल्याने शिवेंद्रराजे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, असा खोचक टोला आ. शशीकांत शिंदे (shashikant shinde). यांनी लगावला आहे.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी आमदार शिवेंद्रराजेंचे नाव वगळून खासदार शरद पवार यांनी नितीन पाटील यांना संधी दिली. बँकेचे नूतन अध्यक्ष नितीन (काका) पाटील यांना आ. शशिकांत शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.

shashikant shinde : सातारा जिल्हा बँकेत नेहमीच पक्ष विरहीत कामकाज

शिंदे म्हणाले, सातारा जिल्हा बँकेत नेहमीच पक्ष विरहीत कामकाज चालत आले आहे. स्व. लक्ष्मणराव (तात्या) पाटील यांनी पक्षाशी बांधिलकी ठेवत शरद पवार यांच्या विचारांची पाठराखण केली होती. त्यामुळे त्यांच्या मुलाला श्री. पवारसाहेबांनी अध्यक्ष बनवलं आहे. याचा आनंदच असून कार्यकर्त्यांतही समाधानाचे वातावरण आहे. माझ्या पराभवानंतर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या आणि याच शरद पवारसाहेबांनी ओळखल्या. त्यामुळेच नितीन पाटील यांना अध्यक्ष बनविल्याची भावना आ. शिंदे यांनी बोलून दाखवली.

 …तर शिवेंद्रराजेंची शिफारस केली असती

आ. शशिकांत शिंदे म्हणाले, मी निवडून आलो असतो तर शिवेंद्रराजेंची शिफारस शरद पवार साहेबांच्याकडे करु शकलो असतो. या आधी शिवेंद्रराजे भोसले हे अध्यक्ष झाले होते. तेव्हा सुद्धा पवार साहेबांच्याकडे मीच शिफारस केली होती. यावेळी माझाच पराभव झाल्यामुळे माझ्यासारख्याची शिफारस कमी पडली. त्यामुळेच शिवेंद्रराजे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, असा टोला ही आ. शिंदे यांनी लागावलाय.तसेच शरद पवार यांना मी शिवेंद्रराजेंना जिल्हा बँकेचा अध्यक्ष करु नका, असे कधीच सांगितलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचलं का? 

SCROLL FOR NEXT