Latest

Share Market Updates | शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, सेन्सेक्स २१५ अंकांनी घसरून ६०,९०६ वर बंद

दीपक दि. भांदिगरे

Share Market Updates : सेन्सेक्स आणि निफ्टीने सलग चार सत्रांत वाढ नोंदवल्यानंतर बुधवारी त्यात घसरण झाली. जागतिक बाजारात संमिश्र संकेत दिसत आहेत. याचे पडसाद भारतीय शेअर बाजारात दिसून आले. बुधवारी सुरुवातीपासूनच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्स २१५ अंकांनी घसरून ६०,९०६ वर बंद झाला. तर निफ्टी ६२ अंकांनी खाली येऊन १८,०८२ वर बंद झाला.

हे शेअर्स ठरले टॉप लुजर्स

NSE प्लॅटफॉर्मवर आज भारती एअरटेल, टायटन, इन्फोसिस, हिरो मोटरकॉर्प आणि एशियन पेंट्स या कंपन्यांचे शेअर्स १.७१ टक्क्यांपर्यंत घसरले. याउलट हिंदाल्को, टाटा स्टील, सन फार्मा, डॉ. रेड्डीज आणि जेएसडब्ल्यू स्टील या कंपन्यांचे शेअर्स टॉप गेनर्स होते.

भारती एअरटेलचे शेअर्स घसरले

दोन सत्रांतील वाढीनंतर आज भारती एअरटेलचे शेअर्स घसरले. हा शेअर बीएसईवर ८३५.३५ रुपयांच्या आधीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी घसरून ८१०.२५ रुपयांवर आला. बीएसईवर या कंपनीचे मार्केट कॅप ४.५२ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. एका वर्षात हे शेअर्स १४.०५ टक्क्यांनी वाढला होता. दरम्यान, मारुती सुझुकी इंडियाचा शेअर्स २.३६ टक्क्यांनी घसरून ९,२३२ रुपयांवर आला.

फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक बैठकीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक बैठकीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे. या बैठकीत व्याजदरवाढीवर निर्णय होणार आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी दोन्ही निर्देशांक किंचित घसरले. New York Stock Exchange वर रात्रभर घसरण होऊनही आज सुरुवातीच्या व्यवहारात आशियाई समभागांमध्ये वाढ झाली. जपानचा निक्केई निर्देशांक ०.०२ टक्क्यांनी वाढला, दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.२१ टक्क्यांनी वाढला. तर शांघाय कंपोझिट निर्देशांक ०.६३ टक्क्यांनी वाढला आणि हँग सेंग निर्देशांक १.०४ टक्क्यांनी वाढला.

सलग चार सत्रांत वाढ

मंगळवारी सेन्सेक्सने ६१ हजारांचा टप्पा पार केला होता. निफ्टीही वधारुन १८ हजारांवर गेला होता. अमेरिकन बाजारातील तेजी आणि आशियाई बाजारातील सकारात्मक संकेतामुळे काल गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक वातावरण तयार झाले होते. तसेच सोमवारच्या मजबूत विदेशी फंड खरेदीच्या जोरावर सेन्सेक्स ६१ हजारांवर पोहोचला आहे. सेन्सेक्सची ही १० महिन्यांतील उच्च पातळी आहे. जूनच्या मध्यावधीला सेन्सेक्स ५१ हजारांवर होता. तो आता ९ हजार अंकांनी वाढून ६१ हजांरावर गेला आहे. सेन्सेक्स मंगळवारी ३७४ अंकांनी वाढून ६१, १२१ वर बंद झाला. तर निफ्टी १३३ अंकांनी वाढून १८,१४५ वर बंद झाला होता. (Share Market Updates)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT