Latest

Share Market Today | जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत, घसरणीला ब्रेक, सेन्सेक्सची १ हजार अंकांनी उसळी

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुरुवारच्या घसरणीनंतर आज शुक्रवारी (दि.११) शेअर बाजार सावरला. जागतिक संकेत सकारात्मक असून आशियाई शेअर बाजार उच्च पातळीवर व्यवहार करत आहेत. तसेच अमेरिकेतील शेअर्स झपाट्याने वाढले होते. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात सकारात्मक ट्रेंड आला. शुक्रवारी सकाळी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स, निफ्टीत तेजी दिसून आली. बाजार खुला होताच सेन्सेक्स ८०० अंकांनी वाढून ६१, ४०० वर गेला. तर निफ्टी २३३ अंकांनी वधारुन १८,२०० वर गेला. त्यानंतर ही तेजी वाढत जाऊन सेन्सेक्सने १ हजार अंकांची उसळी घेतली. टेक महिंद्रा, विप्रो, इन्फोसिस, अपोलो हॉस्पिटल्स आणि एचसीएल टेक यांचे शेअर्स आज NSE वर ३.५४ टक्क्यांपर्यंत वाढले. याउलट आयशर मोटर्स आणि हिरो मोटोकॉर्प यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. दरम्यान, सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ६४ पैशांनी वाढून ८०.७६ वर पोहोचला आहे.

जपानचा निक्केई २२५ निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात २ टक्क्यांपेक्षा अधिक वधारला. तर दक्षिण कोरियाच्या कोस्पीने ३ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली. सिंगापूर एक्स्चेंजवरील निफ्टी फ्यूचर्सने २९९ अंकांनी म्हणजेच १.६५ टक्क्यांनी वधारून १८,३९६ वर व्यवहार केला. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढीचा वेग कमी करेल या शक्यतेने गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत.

काल गुरुवारी सेन्सेक्स ४१९ अंकांनी घसरून ६०,६१३ वर बंद झाला होता. तर निफ्टी १२८ अंकांनी खाली येऊन १८,०२८ वर बंद झाला होता. जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत आणि अमेरिकेतील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर भारतासह आशियाई बाजारात घसरण दिसून आली होती. दरम्यान, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ३३ पैशांनी घसरून ८१.८० वर बंद झाला होता.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT