Share Market Opening : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आज पतधोरण जाहीर करणार आहे. या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी (दि.६) सेन्सेक्स आणि निफ्टीने सावध सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे १२० अंकांनी घसरून ५९,५६८ वर आला. तर निफ्टी १७,५०० वर व्यवहार करत होता. बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून येत आहे. निफ्टी बँक ९५ अंकांनी घसरून ४०,९०० वर आला आहे.
नेस्ले इंडिया, हिंदुस्तान युनिलिवव्हर, कोटक महिंद्रा बँक, एचसीएल टेक्नॉलॉजीस आणि टेक महिंद्रा हे टॉप लूजर्स होते. तर लार्सेन अँड टुब्रो, आयशर मोटर्स, बीपीसीएल, अदानी एंटरप्रायजेस आणि बजाज ऑटो यांचे शेअर्स आघाडीवर होते.
आरबीआय आज रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची वाढ करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. (Share Market Opening)
हे ही वाचा :