Latest

Share Market Closing | सेन्सेक्सची सलग दुसऱ्या दिवशी घसरण, जाणून घ्या मार्केटमध्ये आज काय घडलं?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : शेअर बाजारातील सेन्सेक्सची सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. जागतिक सकारात्मक संकेतांचा मागोवा घेत आज भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत खुले झाले होते. पण आयटी, एफएमसीजी आणि PSU बँकिंग स्टॉक्समधील घसरणीमुळे बाजार वरच्या स्तरावरुन खाली आला. बाजारातील घसरणीत आयटी, FMCG आणि सरकारी बँकांच्या शेअर्सचा समावेश होता. सेन्सेक्स आज २२३ अंकांनी घसरून ६२,६२५ वर बंद झाला. तर निफ्टी ७१ अंकांच्या घसरणीसह १८,५६३ वर स्थिरावला. (Share Market Closing)

भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर स्थिर ठेवल्याच्या एका दिवसानंतर बँकिंग आणि वित्तीय स्टॉक्सच्या आघाडीच्या जोरावर भारतीय बाजार शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात किरकोळ वाढला होता. पण तेजी अधिक वेळ टिकून राहिली नाही.

'हे' शेअर्स वधारले, 'हे' घसरले

सेन्सेक्सवर इंडसइंड बँक, ॲक्सिस बँक, एलटी, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक हे शेअर्स वधारले. तर टाटा स्टील, एसबीआय, एचसीएल टेक, हिंदुस्तान युनिलिव्हर, इन्फोसिस, एशियन पेंट्स, आयटीसी, टीसीएस, टेक महिंद्रा, रिलायन्स, विप्रो, एम अँड एम हे शेअर्स घसरले. दरम्यान, बँक ऑफ महाराष्ट्राचा (Bank of Maharashtra) शेअर ६.५९ टक्के घसरून २८.३५ रुपयांवर आला.

एसबीआयचा शेअर घसरला, जाणून घ्या कारण

स्टेट बँक ऑफ इंडियाला शुक्रवारी चालू आर्थिक वर्षात कर्ज साधनांद्वारे ५० हजार कोटी रुपये उभारण्यासाठी बोर्डाची मंजुरी मिळाली. या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाचा (State Bank of India) शेअर १.६६ टक्के घसरून ५७८ रुपयांवर आला.

केमिकल मॅन्यूफॅक्चरर कंपनीच्या शेअर्सची दमदार कामगिरी

केमिकल मॅन्यूफॅक्चरर कंपनी एथर इंडस्ट्रीजचे (Aether Industries) शेअर्स बीएसईवर शुक्रवारच्या इंट्राडे ट्रेडमध्ये ७.५ टक्के वाढून १,०५६ रुपयांवर पोहोचले. या फर्मने कन्व्हर्ज पॉलीओल्स तंत्रज्ञानाच्या व्यापारीकरणासाठी सौदी अरामको टेक्नॉलॉजीज कंपनीसोबत परवाना करार केला आहे. या पार्श्वभूमीवर एथरचे शेअर्स वधारले.

जागतिक बाजारातील स्थिती

अमेरिकेतील शेअर बाजार काल वाढून बंद झाले. येथील गुंतवणूकदारांचे आता १४ जून रोजी होणाऱ्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीकडे लागले आहे. गुंतवणूकदार पुढील आठवड्यात युरोपियन सेंट्रल बँक आणि बँक ऑफ जपान यांच्याकडून होणाऱ्या व्याजदर निर्णयांचीही वाट पाहत आहेत. दरम्यान, आज आशियाई बाजार तेजीत होते. विशेष कोटेशन किंमत निश्चित केल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाल्याने जपानचा निक्केई निर्देशांक शुक्रवारी झपाट्याने वाढला. निक्केई निर्देशांक १.९७ टक्के वाढून ३२,२६५ वर बंद झाला आणि सोमवारपासूनचा त्यात वाढ झाली आहे. हा निर्देशांक या आठवड्यात २.३५ टक्के वाढला आहे. (Share Market Closing)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT