Latest

Sharad Pawar: सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय कार्याध्यक्ष पद का दिले?; शरद पवार म्‍हणाले…

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कामाची योग्य विभागणी होण्यासाठी राष्ट्रवादीत दाेन कार्याध्यक्ष पदे निर्माण केली आहेत. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल तटकरे यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.  लोकांच्या आग्रहास्तव सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष पद दिले आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (दि.१०० पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.  अजित पवारांकडे आधीच मोठ्या जबाबदारी असल्याने त्यांच्याकडे जबाबदारी दिलेली नाही, त्यामुळे ते नाराज नाहीत, असा खुलासाही त्‍यांनी यावेळी केला.

पवार (Sharad Pawar) म्हणाले की, इतर राज्यात पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली. कुठल्या राज्यात विधानसभा लढवता येतील याबाबतही चर्चा करण्यात आली. पक्षातील संघटन मजबूत करण्यासाठी नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे पक्षातील सहकाऱ्यांना मोठी जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पक्षात दोन कार्याध्यक्षांची पदे निर्माण केली आहेत. या पदावर खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी दिली आहे.

पवार पुढे म्हणाले की, २३ जूनला पाटणामध्ये विरोधकांची बैठक होणार आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली जाणार आहे. लोकांना केंद्रात परिवर्तन हवे आहे. त्यासाठी देशातील सर्व विरोधकांची एकजूट होण्याची गरज आहे. भाजपची सत्ता असलेल्या राज्यात विरोधकांकडून एकच उमेदवार देण्याची सुचना या बैठकीत करणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. जिथे भाजप मजबूत आहे, तिथे एकच उमेदवार देण्याबाबत सुचना करू, असेही पवार यांनी सांगितले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT