Latest

अजित पवारांचे चिरंजीव उर्वशी रौतेलासोबत दिसल्याने चर्चांना उधाण ! फोटो व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू आणि अजित पवार यांचा मुलगा जय पवार याची चर्चा होतं आहे. कारण आहे-तो एका प्रसिध्द अभिनेत्रीसोबत कॅमेराबध्द झाला आहे. ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे उर्वशी रौतेला. जय पवार आणि उर्वशी रौतेला या दोघांचा फोटो व्हायरल झाला आहे, त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्व आहे. राजकारणातील धुरंदराची अनेकवेळी चर्चा होतेय. पण, आता ते चर्चेत वेगळ्याच कारणामुळे आले आहेत. शरद पवार यांचा नातू आणि अजित पवार यांचा मुलगा जय अभिनेत्री उर्वशीसोबत दिसलाय. त्यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

जय आणि उर्वशी नेमक्या कोणत्या कामासाठी भेटले, हे तर अद्याप समजलेलं नाही. त्यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये उर्वशी आणि जय यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती दिसत आहे. उर्वशी आणि जय पवार यांचा हा फोटो 'cine riser official' या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा फोटो दुबईच्या बुर्ज-अल-अरब येथील असल्याचं म्हटलं जात आहे. या फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू असून तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

हा फोटो कधीचा आहे? दोघे खरचं दुबईत आहेत का? जय उर्वशीला डेट तर करत नाही ना? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. पण याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण, सूत्रांनुसार, दोघे एका शोच्या निमित्ताने एकत्र आले असल्याचं समोर आलंय.

हेही वाचा-

SCROLL FOR NEXT