Latest

President Election 2022 : राष्ट्रपती पदासाठी शरद पवार यांच्या नावाची विरोधी पक्षांकडून चर्चा

अमृता चौगुले

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : राष्ट्रपती निवडणुकीच्या (President Election 2022) पाश्वभूमीवर सर्व विरोधी पक्ष ॲक्टीव्ह झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. सध्या हे विरोधी पक्ष राष्टपती उमेदवाराबाबत चर्चा करत आहेत. विरोधी पक्षांच्या बैठकीत सर्वसहमतीने उमेदवाराचा शोध सुरु आहे. या चर्चांमधून राष्ट्रपती उमेदवारासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव पुढे येत आहे. असे सांगण्यात येत आहे की, देशातील सर्व विरोधी पक्षांचा उमेदवार म्हणून शरद पवार यांना पसंती मिळू शकेल.

काँग्रेसने राष्ट्रपती पदाच्या (President Election 2022) उमेदवारीसाठी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. या बाबतचा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचा निरोप घेऊन काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी गुरुवारी मुंबई येथे शरद पवार यांची भेट घेतली होती. सुत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रपती काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसच्या या प्रस्तावावर अद्याप कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही. शिवाय मल्लिकार्जन खर्गे यांनी यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) व तामिळनाडुचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन (Tamil Nadu Chief Minister M. K. Stalin) यांच्याशी सुद्धा चर्चा केली आहे.

याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Delhi Chief Minister Aravind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षाचे (Aam Adami Party) नेते संजय सिंह यांनी सुद्धा शरद पवार यांना या संदर्भात रविवारी फोन केला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खर्गे यांनी पश्चिम पंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal Chief Minister Mamata Banerjee) यांच्याशी सुद्धा फोन चर्चा केली आहे. यासंदर्भात ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेत राष्ट्रपती निवडणुकीत (President Election 2022) सर्व विरोधी पक्षांचा उमेदवार निश्चीत करण्यासाठी तसेच या निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी बुधवारी दिल्लीमध्ये कॉन्स्टीट्युशनल क्लब येथे सर्व विरोधी पक्षांच्या नेत्याची व बिगर भाजप शासीत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे.

भारताच्या पुढील राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलै रोजी निवडणुका होणार आहेत. गरज भासल्यास त्यानंतर तीन दिवसांनी मतमोजणी केली जाईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Central Minister Rajnath Singh) यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तसेच देशातील सर्वात मोठा राजकीय अनुभव असणारे जेष्ठ नेते शरद पवार यांना अेनक आघाडी सरकार बनविण्याचे तसेच आघाडी तोडण्याचे श्रेय दिले जाते. त्यांनी महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रसची आघाडी घडवून आणत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. त्यामुळे देशातील सर्व विरोधी पक्षे शरद पवार यांच्या नावावर सहमती दर्शवतील अशी स्थिती आहे.

दुसरीकडे भाजपने (BIP) राष्ट्रपती निवडणुकीसाठी अध्यक्ष जे.पी.नड्डा (J.P.Nadd) तसेच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह (Central Minister Rajnath Singh) यांच्याकडे सर्व पक्षांसोबत चर्चा करुन एकमत बनविण्याची जबाबदारी सोपविली आहे. पण, अद्याप भाजपकडून राष्ट्रपती पदासाठीच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा झाली नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT