Latest

भाजपकडून खांदेपालट: पिंपरी-चिंचवडमध्ये शंकर जगताप नवे शहराध्यक्ष

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन: 2024 च्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर भाजप चांगलंच कामाला लागल्याचं दिसत आहे. भारतीय जनता पक्षाने स्थानिक पातळीवर भाकरी फिरवली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षाची खांदेपालट करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षपदी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्यात बदल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्य़क्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करुन 70 नावांची घोषणा केली आहे. यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या दृष्टीकोनातून भाजपने जोरदार तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचा शहराध्यक्षचा कालावधी संपल्याने शहराची धुरा आता शंकर जगताप यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

कोण आहेत शंकर जगताप?

माजी नगरसेवक शंकर जगताप हे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे लहान बंधू आहेत. आमदार लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र, त्यानंतर लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी आमदारपदासाठी भाजपचा खरा चेहरा म्हणून शंकर जगताप यांच्याच नावाची चर्चा होती.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT