जामखेड : पोलिसांकडून स्वसंरक्षणासाठी आरोपीच्या पायावर गोळीबार ; 3 जणांना अटक | पुढारी

जामखेड : पोलिसांकडून स्वसंरक्षणासाठी आरोपीच्या पायावर गोळीबार ; 3 जणांना अटक

जामखेड (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व त्यांच्या पथकाची आरोपीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना झटापट झाली. यामध्ये दोन पोलीस किरकोळ जखमी झाले असून पोलीस निरीक्षक महेश पाटील स्वरक्षणासाठी यांनी स्वसंरक्षणासाठी आरोपीच्या पायावर गोळीबार केला. यानंतर तीनही आरोपी ताब्यात घेतले गेले, या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. आरोपींनी जामखेड शहरातील तपनेश्वर येथे कारचालकाच्या डोक्याला पिस्टल लावून कार पळवली. सदर माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी आरोपी शोधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्यांना खर्डा रस्त्यावर एका हॉटेल समोर तीन आरोपी बसलेले दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना झटापट झाली. यामध्ये दोन पोलीस किरकोळ जखमी झाले.

यादरम्यान एका आरोपीने पिस्टलमधून पोलीसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी स्वसंरक्षणासाठी आरोपीच्या पायावर गोळीबार करून तीनही आरोपी ताब्यात घेतले. जखमी आरोपीला नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी रवाना केले. याप्रकरणी पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत.

जामखेड पोलीसात पोलीस कॉन्स्टेबल संतोष नामदेव कोपनर यांनी फिर्याद दिली की, 19 रोजी 00/10 वा. चे सुमारास आरोपीत प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार, शुभम बाळासाहेब पवार, काकासाहेब उत्तम डुचे सर्व (रा. सारोळा ता. जामखेड) यांनी जामखेड शहरातील तपनेश्वर रोड येथे इसम नामे अदनान जहर शेख (रा. तपश्वररोड, जामखेड ता. जामखेड) यांचे डोक्याला पिस्टल लावून त्याच्या ताब्यातील अर्टिगा गाडीची (एमएच 12 केटी 4795) चोरी केली होती. पोलीसांनी वरील सर्व तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुध्द भा.द.वि. कलम 307, 353, 332, 34 तसेच भारतीय हत्यार कायदा सन 1959 चे कलम 3/25 व 28 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button