Latest

Shahrukh Khan Mother : शाहरुखच्या आईचा फोटो व्हायरल, इंदिरा गांधींशी होते त्यांचे खास नाते?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : किंग खान शाहरुखनने (Shahrukh Khan Mother) पाच वर्षांनंतर पडद्यावर वापसी केलीय. फॅन्स त्याला आर माधवनचा चित्रपट रॉकेट्रीमध्ये पाहण्यास उत्सुक आहेत. दुसरीकडे, शाहरुख खानची आई लतीफ फातिमा खानचा एक फोटो सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहेत. शाहरुख खानची आई फातिमा खान एक प्रभावशाली महिला होत्या. त्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक होती. त्या हैदराबादच्या राहणाऱ्या होत्या आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी (इंग्लंड)च्या रँक-होल्डर मजिस्ट्रेट होत्या. तसं पाहिलं तर शाहरुख जवळपास सर्व मुलाखतीत आपल्या आईची खूप आठवण काढतो. (Shahrukh Khan Mother)

शाहरुखने अनेकदा आपल्या मुलाखतीत सांगितलं आहे की, त्याच्या आई-वडिलांची प्रेमविवाह होता. त्याने हेदेखील सांगितलं आहे की, कशाप्रकारे एका अपघाताच्या दरम्यान, त्याच्या आईला वाचवताना दोघे जवळ आले होते. शाहरुख खानची एक बहीणदेखील लैला जी मन्नतमध्ये किंग खानसोबत राहते. शाहरुख आपल्या फॅमिलीसोबत एक स्पेशल बॉन्ड शेअर करतो. शाहरुख खान दिल्लीचा राहणारा आहे. त्याने चित्रपट इंडस्ट्रीत ३० वर्षे पूर्ण केली आहेत. १९९२ मध्ये त्याने चित्रपट दीवानामधून आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

शाहरुख खान आर माधवनच्या रॉकेट्री: द नांबी इफेक्टमध्ये कॅमियो करत मोठ्या पडद्यावर वापसी केली होती. त्याच्या कॅमियोने प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. पुढील वर्षी शाहरुखचे तीन मोठे चित्रपट रिलीज होतील. पठाण २०२३ ला रिलीज होईल. एटली की जवान, डंकी अशा चित्रपटात शाहरुख राजकुमार हिरानीचा हिरो म्हणून समोर येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT