पिंपरी : सावित्रीबाई फुले अकादमीसाठी निवृत्त अधिकारी

पिंपरी : सावित्रीबाई फुले अकादमीसाठी निवृत्त अधिकारी
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात येणार्‍या सावित्रीबाई फुले अकादमी या संस्थेसाठी संचालक म्हणून सेवानिवृत्त शासकीय अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे, असे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी सांगितले.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणार्‍या नागरी सेवा परीक्षांना बसणार्‍या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यासाठी पालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे सन 2022-23 पासून नव्याने सावित्रीबाई फुले अकादमी सुरू करण्यात येत आहे. संचालक या पदासाठी 6 महिन्यांकरिता करार पद्धतीने मानधन तत्त्वावर निवृत्त शासकीय अधिकारी, तज्ज्ञ यांची निवड करण्यात येणार आहे.

ही निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. येत्या शनिवारी (दि. 16) सकाळी अकरा वाजता आयुक्त यांच्या दालनात मुलाखत घेतली जाणार आहे. या पदासाठी पालिकेच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news