Latest

Pathaan : ‘झूमे जो पठान’ शूटिंगवेळी शाहरुख इतका लाजला की..(Video)

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या पठानने दमदार कलेक्शन केलं आहे. या चित्रपटातील गाणे 'झूमे जो पठान' (Pathaan) देखील सिनेरसिकांच्या पसंतीस उतरला आहे. इतकचं नाही तर या गाण्यावर अनेक प्रेक्षक अक्षरश: चित्रपटगृहात जाऊन डान्स करतानाही दिसले. आता या गाण्याचा मेकिंग व्हिडिओ समोर आला आहे. हे गाणे कसे चित्रीत करण्यात आले आणि यावेळी शाहरुख खान किती लाजला होता, हे या व्हिडिओतून पाहायला मिळत आहे. (Pathaan)

'झूमे जो पठान' मध्ये शाहरुख खानने ॲब्स दाखवले आहेत. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने खुलासा केला आहे की, या गाण्याच्या शूटिंगवेळी जेव्हा किंग खान शर्टाचे बटन उघडत होता, तेव्हा तो खूप लाजला होता.

यशराज फिल्म्सने यूट्यूब अकाऊंटवर 'झूमे जो पठान' गाण्याचा मेकिंग व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान आणि सिद्धार्थ आनंद बातचीत करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये शाहरुख खान 'झूमे जो पठान' गाण्याच्या मेकिंगविषयी म्हणतो, 'आम्ही असे स्टेप्स करू इच्छितो की, जे सोपे असतील आणि प्रत्येकाला ही स्टेप जमली पाहिजे. हे एक मजेशीर गाणं आहे, जे पार्टी सॉन्ग आहे. तुमचे पाय यावर नक्कीच थिरकतील.'

हे गाणे बॉस्को मार्टिसने कोरिओग्राफ केलं आहे. व्हिडिओमध्ये दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद म्हणतो-'शाहरुख इतका लाजाळू आहे की, तो आपल्या शर्टाचे बटनदेखील उघडताना लाजतो. पण, तुमच्याकडे अशी शरीरयष्टी असेल तर तुम्हाला ते जगाला दाखवायलाचं हवं.'

यानंतर शाहरुख खान व्हिडिओमध्ये म्हणतो, 'मला खूप लाज वाटत होती. पण मी खूप खुश आहे की, जेव्हा माझी मुले म्हणतात की-'पापा लवली बॉडी'. पण, हे खूपच भीतीदायक आहे. मला माहिती नाही की, मी हे पुन्हा करू शकेन की नाही.'

SCROLL FOR NEXT