अभिनेत्री करिना कपूर नेहमीच चर्चेत असते. व्हॅलेंटाईन डेमुळे सध्या सर्वत्र करिनाची चर्चा आहे. प्रत्येकाने पार्टनरबरोबर व्हॅलेंटाईन डेचा आनंद लुटला. करिनानेही व्हॅलेंटाईन डेचा आनंद लुटला, पण तिने पती सैफ अली खानसोबत नाही तर, तिच्या आयुष्यातील खास व्यक्तींसोबत प्रेमाचा दिवस साजरा केला. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी करिनाने घरी व्हॅलेंटाईनचा आनंद कुटुंबासोबत लुटला. सैफची बहीण सबा अली खान हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. करिना लहान मुलगा जेह आणि सासू यात यांच्यासोबत दिसत आहे. फोटो शेअर करत सबा हिने कॅप्शनमध्ये, माझे व्हॅलेंटाईन डे! माझ्या आयुष्यातील काही खास व्यक्तींसोबत! मी आज सुंदर मुली आणि जेह यांच्या मागे लपली आहे..' सध्या सबाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सबा हिनेच नाही, तर करिना कपूर हिनेदेखील इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हॅलेंटाईन डेचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री तिच्या आयुष्यातील खास व्यक्तींसोबत दिसत आहे.