Latest

Jawan Movie Trailer : प्रतीक्षा आणखी वाढली! बुर्ज खलिफावर ‘या’ दिवशी होणार ‘जवान’ ट्रेलर लॉन्च

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या आगामी 'जवान' या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. 'जवान' या चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असून सर्वत्र त्याचीच चर्चा होत आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. त्याचवेळी, शाहरुख खानने त्याच्या सोशल मीडियावर घोषणा केली आहे की, 'जवान' (जवान ट्रेलर) चित्रपटाचा ट्रेलर ३१ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानने 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च दुबईतील बुर्ज खलिफा येथे होणार असल्याचे उघड केल्याने त्याच्या चाहत्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.

शाहरुख खानने हे ट्विट केले आहे

शाहरुख खानने त्याच्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचे लूक पोस्टर दुबईतील बुर्ज खलिफावर दिसत आहे. शाहरुख खानने त्यासोबत लिहिले आहे की, 'जर मी जवान तुमच्यासोबत साजरा केला नाही तर असे होऊ शकत नाही. मी ३१ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता बुर्ज खलिफा येथे येत आहे, जवान माझ्यासोबत साजरा करा. आणि प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना असल्यामुळे आपण प्रेमाच्या रंगात रंगूया आणि आपण सर्वांनी लाल कपडे घालूया, काय म्हणता? तयार!'

'जवान' चित्रपटाची रिलीज डेट

अॅटली कुमार दिग्दर्शित 'जवान' हा चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि अॅटली कुमार पहिल्यांदाच काम करत आहेत. 'जवान' चित्रपटात शाहरुख खानसोबत नयनतारा, योगी बाबू, रिद्धी डोगरा आणि सुनील ग्रोव्हर हे देखील दिसणार आहेत. त्याचबरोबर दीपिका पदुकोण या चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे. शाहरुख खानचा हा पहिला पॅन इंडिया चित्रपट आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT