Latest

Shahrukh Khan in KIFF : शाहरुख-अमिताभ यांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, राणी मुखर्जीनेही घेतला हाताचा किस

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचे शहंशहा अमिताभ बच्चन, जया बच्चन, किंग ऑफ रोमान्स शाहरुख खान, राणी मुखर्जी, अरिजीत सिंह तमाम बॉलीवूड स्टार्सनी २८ व्या कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (KIFF 2022) मध्ये हजेरी लावली. (Shahrukh Khan in KIFF ) या उद्घाटन समारंभात ममता बॅनर्जी यांची लक्षणीय उपस्थिती होती. या इवेंटमध्ये अभिनेत्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी चित्रपट 'पठाण'मधील गाणं 'बेशर्म रंग' वरील वादावरून शाहरुखने सडेतोड उत्तर देखील दिलं. (Shahrukh Khan in KIFF )

समारंभाच्या सायंकाळी शाहरुख स्टेजवर पोहोचताचं अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या पाया पडत आशीर्वाद घेतले. तर राणी मुखर्जींनीही जया यांचे आशीर्वाद घेतले. दरम्यान, राणीने शाहरुखच्या हाताचा किस घेतला. व्हायरल व्हिडिओमध्ये शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांच्यामध्ये बॉन्डिंग हे स्पष्ट दिसत आहे. दोघांनी 'कुछ कुछ होता है', 'कभी अलविदा ना कहना' सह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. तिने SRK च्या हातावर किस केलं आणि चेष्टा मस्करी करताना दिसली.

आपल्या भाषणात राणीने शाहरुखला 'पठान' म्हणून संबोधित केलं. या इवेंटमध्ये गायक अरिजित सिंगही उपस्थित होता. त्याने शाहरुख खानसाठी 'गेरुआ' गाण्याची ओळ गुंफली. यानंतर शाहरुखनेही टाळ्या वाजवून गायकाचे स्वागत केले. शत्रुघ्न सिन्हा यांनीही कार्यक्रमात शाहरुख खानचे कौतुक केले.

सध्या देशभरात 'पठाण' चित्रपटावरून वाद सुरू आहे. या सगळ्यामध्ये त्यांनी 'जग जे काही करते ते करा, मी आणि तुम्ही आणि सर्व सकारात्मक लोक जिवंत आहोत' असे सडेतोड उत्तर दिले. या कार्यक्रमात महेश भट्ट, सौरव गांगुली, कुमार सानू आणि शत्रुघ्न सिन्हा देखील उपस्थित होते. शाहरुख खानचा शेवटचा सिनेमा 'झिरो' 2018 साली रिलीज झाला होता. तो अलीकडेच 'ब्रह्मास्त्र'मध्येही कॅमिओमध्ये दिसला होता. पण मुख्य अभिनेता म्हणून तो तब्बल ४ वर्षांनी 'पठाण'मधून पडद्यावर परतत आहे.

shahrukh and rani

या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर खूप आवडले होते. परंतु, 12 डिसेंबर, 2022 रोजी त्याचे पहिले गाणे 'बेशरम रंग' रिलीज होताच एकच गोंधळ उडाला होता. प्रथम, दीपिका पदुकोणच्या कामुक डान्स स्टेप्स आणि लुकवर आक्षेप घेण्यात आला. यानंतर काही लोकांनी तिच्या बिकिनीचा रंग पाहिला आणि तिला 'केसरी बिकिनी' म्हणत टीका केली.

दरम्यान, मध्य प्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रापासून ते अयोध्येचे महंत राजू दास, हिंदू महासभा, वीर शिवाजी गट, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी नाराजी व्यक्त केली. आता एका व्यक्तीने दीपिकाविरोधात माहिती आणि प्रसारण मंत्रालयात तक्रार दाखल केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT