Latest

Boycott Pathan : शाहरुखचा ‘पठाण’ बॉयकॉट करण्याची मागणी; Deepika वर मीम्सचा पाऊस

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पठाण चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच चर्चेत आला आहे. या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या गाण्यातील दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकिनीवरून नवा वाद निर्माण झाला. या गाण्यात दीपिकाने परिधान केलेली बिकिनी भगव्या रंगाची आहे. शिवाय या गाण्यात काही मादक मुव्ह्ज आहेत. ग्लॅमरस दिसणाऱ्या दीपिकाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. शिवाय तिच्या लूकवरून मीम्सचा पाऊस पडताना दिसतोय. ट्विटरवर #Boycott Pathan हा ट्रेंड सुरु आहे. यामध्ये शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Boycott Pathan )

२५ जानेवारी, २०२३ रोजी हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू भाषेत प्रदर्शित होईल. यशराज बॅनरची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. बेशरम रंग या गाण्यात शाहरुख आणि दीपिका रोमान्स करताना दिसत आहेत. शिवाय तिने परिधान केलेली बिकिनी भगव्या रंगाची आहे. त्यामुळे या रंगावरून नेटकरी मीम्स तयार करत आहेत. दीपिकाच्या या लूकनंतर ट्विटरवर पठाण चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे.

गीतकार कुमार यांचे हे गाणे विशाल-शेखर यांनी संगीतबद्ध केले आहे. शिल्पा राव कारलिसा मोंटेरियो यांनी गाण्याला आवाज दिला आहे. मात्र गाण्यातील दीपिकाच्या लूकवरून नेटकऱ्यांमध्ये नाराजी आहे. आऊटफिटचा भगवा रंग असल्याने नेटकऱ्यांकडून विरोध होत आहेत.

काहींनी या चित्रपटातील शाहरुख आणि दीपिकाची जोडी जमत नसल्याचे म्हटले आहे.

हे देखील वाचा – 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT