Latest

पुणे : औंधमध्ये उच्चभ्रू भागात चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृततसेवा : औध परिसरातील उच्चभ्रू परिसरात 'द व्हाईट विलो स्पा मसाज सेंटर'च्या नावाखाली चालणार्‍या सेक्सरॅकेटचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला. यावेळी आसाम येथील एकाला बेड्या ठोकत मुंबईतील एका मॉडेलसह आसाम, मनिपूर येथील मिळून सहा महिलांची सुटका सामाजिक सुरक्षा विभागाने केली.

याप्रकरणी 'द व्हाइट विलो स्पा' चा सहायक व्यवस्थापक सुफियान जमालुद्दिन अहमद (23, रा. रिध्दी कॉम्प्लेक्स, माधुरी पार्क सोसायटी, औंध) याला अटक करण्यात आली आहे. स्पा मालक वेंकटेश टिपू राठोड (38, रा. रा. बर्मा शेल, लोहगाव रोड, इंदिरानगर), स्पा व्यवस्थापक देवीसिंग उर्फ लीलाधर शंकरसिंग चव्हाण (30, रा. जयप्रकाश नगर, इंडियन एअर फोर्स स्टेशन, लोहगाव), गोविंदकुमार सदनिकेचा मालम अभिनव रामनाथ वाजपेयी (रा. ठी. फ्लॅट नं. 303, रिद्धी कॉम्प्लेक्स, माधुरी पार्क को-ऑप सोसायटी, कोटबागी हॉस्पिटल जवळ औंध) आणि मोना रामनाथ वाजपेयी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा लावला सामाजिक सुरक्षा विभागाने ट्रॅप

दि. 15 जून रोजी रोजी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 'द व्हाइट विलो स्पा', फ्लॅट नंबर 303, रिद्धी कॉम्प्लेक्स, माधुरी पार्क को-ऑप हौसींग सोसायटी, कोटबागी हॉस्पिटल जवळ, औंध येथे मसाज स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार छापा टाकताना बनावट ग्राहक पाठविण्यात आला. ग्राहकाने एक्स्ट्रा सर्व्हिससाठी गुगल पे ने पैसे दिल्यावर व ते स्विकारल्यावर, त्याने पोलीस पथकाला इशारा केला.

पळून जाण्यासाठी एसीडक्टचा केला वापर

काउंटरवर बसलेल्या सुफियानने सिसीटिव्हीत पोलिसांना येताना पाहिले. त्याने तात्काळ स्पा चा दरवाजा आतून बंद केला आणि तो आतील खोलीत पळाला. सदरचा दरवाजा पोलिसांनी डमी कस्टमरच्या मदतीने उघडला. पण तो पर्यंत सुफीयान याने पळून जाण्यासाठी दोन महिलांसह फ्लॅटच्या खिडकीतून एसीच्या डक्ट मध्ये प्रवेश केला. तेथून वरचा मजला गाठून, स्पाच्या वरच्या मजल्यावरील खिडकीतून रीसर्च इन्फोटेक सेंटरमध्ये प्रवेश करुन, तेथून पळण्याचा प्रयत्न केला.

मात्र ते पळून जात असताना रीसर्च इन्फोटेक सेंटरच्या कामगारांच्या मदतीने सामाजिक सुरक्षा विभागाने त्यांना पकडले. यावेळी ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेला विचारणा केली असता, तिने स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय करणार्‍या महिलांना शेजारच्या पूजा बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावर फ्लॅट क्र. 601 मध्ये कोंडून ठेवले असल्याचे सांगितले. त्यावरुन पोलिस पथकाने तेथे जाऊन पीडित महिलांचा शोध घेऊन त्यांची सुखरुप सुटका केली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या पथकाने ही कारवाई करताना पीडित मुलींची सुटका केली.

'द व्हाईट वीलो स्पा' हा औंध सारख्या उच्चभ्रू परिसरात असून, त्याच रिद्धी कॉम्प्लेक्स इमारतीत सदर स्पाच्या वरच्या मजल्यावर रीसर्च इन्फोटेक सेंटरअसून, सुमारे दोनशे मीटर परिसराच्या आतच, डिएव्ही पब्लिक स्कूल व कोटबागी
हॉस्पिटल आहे. सदर स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाबाबत आसपासचे नागरिकही हैराण झाले होते व त्या अनुषंगाने तक्रारी सुरू झाल्या होत्या.

        – राजेश पुराणिक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सामाजिक सुरक्षा विभाग.

SCROLL FOR NEXT