Latest

पिंपरीत भाजपला आणखी एक धक्का, संभाजी बारणे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

दीपक दि. भांदिगरे

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक साडेचार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलत आहेत. सत्ताधारी भाजपला गळती लागली आहे. विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला आणखी एक धक्का देत वृक्ष प्राधिकरण समितीचे भाजपचे सदस्य संभाजी बारणे यांना पक्षात घेतले.

आज पुणे येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. यावेळी अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, सुरेश नढे, अभय मांढरे, प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.

या पुर्वी भाजपच्या नगसेविकेचे पती राजू लोखंडे व संतोष बारणे, भाजप संलग्न अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : Manike mage hithe Marathi Version : व्हायरल Manike ला मराठी तडका – apurva naniwadekar

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT