Latest

Stock Market Closing Bell | जोरदार कमबॅक! सेन्सेक्स ६८९ अंकांनी वाढून बंद, गुंतवणूकदारांना ५.४ लाख कोटींचा फायदा

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : शेअर बाजाराने आज कमजोर सुरुवातीनंतर जोरदार कमबॅक केले. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने ७५० हून अधिक अंकांनी वाढून ७१,१०० वर व्यवहार केला. त्यानंतर सेन्सेक्स ६८९ अंकांच्या वाढीसह ७१,०६० वर स्थिरावला. तर निफ्टी २१५ अंकांनी वाढून २१,४५३ वर बंद झाला. निफ्टीची आजची वाढ १ टक्के आहे. (Stock Market Closing Bell)

क्षेत्रीय पातळीवर ऑटो, आयटी, कॅपिटल गुड्स, FMCG, मेटल, ऑईल. गॅस आणि पॉवर १-२ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी २ टक्क्यांनी वाढले. दरम्यान, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (FII) विक्रीच्या बाबतीत अल्पकालीन चिंता कायम आहे.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ५.४ लाख कोटींची वाढ

दरम्यान, आजच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांना ५.४ लाख कोटींचा फायदा झाला. आज बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल काल नोंदवलेल्या ३६५.९७ लाख कोटींच्या तुलनेत आज ५.४१ लाख कोटी रुपयांनी वाढून ३७१.३८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

काल सेन्सेक्स १,०५३ अंकांच्या घसरणीसह ७०,३७० वर बंद झाला होता. तर निफ्टी ३३३ अंकांच्या घसरणीसह २१,२३८ वर राहिला होता. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना सुमारे ८ लाख कोटी रुपयांचा फटका बसला होता. पण आज बाजारात तेजी परतली.

सेन्सेक्स आज ७०,१६५ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७१ हजारांपर्यंत वाढला. सेन्सेक्सवर टाटा स्टील, पॉवर ग्रिड, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, भारती एअरटेल, जेएसडब्ल्यू स्टील, इंडसइंड बँक, एनटीपीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फिनसर्व्ह हे टॉप गेनर्स होते. तर आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, एशियन पेंट्स हे शेअर्स घसरले.

निफ्टीवर हिंदाल्को, डॉ. रेड्डीज, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, बीपीसीएल हे शेअर्स सर्वांधिक ३ ते ४ टक्क्यांनी वाढले. तर आयसीआयसीआय, ॲक्सिस बँक, एशियन पेंट्स, अदानी पोर्ट्स हे शेअर्स घसरले. (Stock Market Closing Bell)

कर्नाटक बँकेचे शेअर्स घसरले

कर्नाटक बँकेचे शेअर्स आज सुमारे १२ टक्क्यांनी घसरून २३३ रुपयांच्या दिवसाच्या निचांकी पातळीवर गेले. दरम्यान, एनएसईवर दुपारच्या व्यवहारात हा शेअर्स २४४ रुपयांवर होता. या बँकेने डिसेंबर संपलेल्या तिमाहीत निव्वळ व्याज उत्पन्न (NII) आणि निव्वळ व्याज मार्जिन (NIMs) मध्ये किरकोळ घट नोंदवली आहे. (Karnataka Bank Share Price)

जागतिक बाजार

चिनी प्रशासन त्यांच्या शेअर बाजारांना पाठिंबा देतील, या आशेने आशियाई शेअर बाजारात आज संमिश्र वातावरण राहिले. ब्लू चिप निर्देशांक कमी झाला तर शांघाय कंपोझिट वाढला. चीनमधील बाजारातही संमिश्र वातावरण होते. हाँगकाँगच्या हँग सेंग निर्देशांकात वाढ झाली. पण तरीही तो महिन्यातील पातळीच्या खाली राहिला. जपानचा निक्केई ०.८ टक्क्यांनी घसरून ३६,२२६.४८ वर आला. निक्केईवर (Japan's Nikkei share) नफावसुलीचा दबाव दिसून आला.

परदेशी गुंतवणूकदार

परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) सलग पाच दिवशी निव्वळ विक्रेते राहिले. NSE च्या आकडेवारीनुसार, त्यांनी २३ जानेवारी रोजी ३,११५.३९ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. याउलट, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) २,१४.४० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT