eBay Layoffs | अमेरिकेत नोकरकपातीची लाट कायम, eBay चा १ हजार कर्मचाऱ्यांना नारळ! | पुढारी

eBay Layoffs | अमेरिकेत नोकरकपातीची लाट कायम, eBay चा १ हजार कर्मचाऱ्यांना नारळ!

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेतील टेक कंपन्यांत नोकरकपातीची लाट सुरु आहे. ॲमेझॉन आणि गुगल सारख्या दिग्गज कंपन्यांनी कोरोना काळात मोठ्या प्रमाणात नोकरभरती केली होती. आता अतिरिक्त मनुष्यबळ कमी करण्याच्या या कंपन्यांचा प्रयत्न आहे. आता दिग्गज ई- कॉमर्स रिटेलर ईबे इंक (eBay Inc) १ हजार नोकऱ्या कमी करणार आहेत. ही नोकरकपात कंपनीच्या एकूण मनुष्यबळाच्या सुमारे ९ टक्के आहे. (eBay Layoffs)

ईबेचे सीईओ जेमी इयानोन यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रातून ही माहिती उघड झाली आहे. “आमचे एकूण मनुष्यबळ आणि खर्च आमच्या व्यवसायाच्या वाढीपेक्षा जास्त आहे,” असे eBay चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेमी आयनोन यांनी कर्मचार्‍यांशी शेअर केलेल्या पत्रात म्हटले आहे.

“याचे निराकरण करण्यासाठी आम्ही संस्थात्मक बदल करत आहोत जे एंड-टू-एंड अनुभव सुधारण्यासाठी आणि जगभरातील आमच्या ग्राहकांच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी विशिष्ट टीम्सना संरेखित आणि एकत्रित करतील.”

नोकरकपात करण्याव्यतिरिक्त ईबे इंक कंपनी येत्या काही महिन्यांत त्याच्या पर्यायी कर्मचार्‍यांची संख्यादेखील कमी करेल, असे इयानोन यांनी पत्रात पुढे म्हटले आहे.

गेल्या फेब्रुवारीमध्ये eBay ने जागतिक स्तरावरील ५०० कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची योजना जाहीर केली होती. ही संख्या एकूण कर्मचार्‍यांपैकी ४ टक्के होती. (eBay Layoffs)

eBay Inc. ही सॅन जोस, कॅलिफोर्निया येथे स्थित एक अमेरिकन बहुराष्ट्रीय ई-कॉमर्स कंपनी आहे. ही कंपनी जगभरातील १९० बाजारपेठांमध्ये ऑनलाइन मार्केटप्लेसद्वारे ब्रोकर्स ग्राहक ते ग्राहक आणि किरकोळ विक्री व्यवसाय करते.

हे ही वाचा :

Back to top button