Latest

Share Market Today | सेन्सेक्स ७२,१०० पार, निफ्टी २१,७०० वर, कोणते शेअर्स तेजीत?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजाराने शुक्रवारी तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे २७० अंकांनी वाढून ७२,१०० वर गेला. तर निफ्टी ७७ अंकांनी वाढून २१,७३० पार झाला. सुरुवातीच्या तेजीत बँकिंग, ऑटो, एनर्जी आणि आयटी शेअर्स आघाडीवर होते.

२०२४ च्या सुरुवातीला होणाऱ्या यूएफ फेड व्याजदर कपातीबद्दल ताज्या आकडेवारीने साशंकता निर्माण केल्याने जागतिक बाजारात दबावाचे वातावरण राहिले आहे. (Share Market Today)

सेन्सेक्सवर विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्रा, टाटा स्टील, टीसीएस, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक, हिंदुस्तान युनिलिव्हर, एनटीपीसी हे शेअर्स सर्वाधिक वाढले. नेस्ले इंडिया, सन फार्मा, इंडसइंड बँक आणि आयटीसी हे शेअर्स घसरले.

निफ्टी ५० वर अदानी पोर्ट्स, विप्रो, टेक महिंद्रा, अदानी एंटरप्रायजेस, LTIMINDTREE हे शेअर्स टॉप गेनर्स होते. नेस्ले इंडिया, सन फार्मा, ब्रिटानिया हे टॉप लूजर्स होते.

MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा व्यापक निर्देशांक सकाळी ०.१ टक्के कमी झाला. हाँगकाँगचा हँग सेंग ०.१८ टक्क्यांनी घसरला. दरम्यान, जपानचा निक्केई ०.५ टक्क्यांनी वाढला. (Share Market Today)

 हे ही वाचा : 

SCROLL FOR NEXT