Latest

Seema Haider : सीमा हैदरला तिचे कुटुंब व शेजाऱ्यांनी नाकारले; म्हणाले, ती आता मुसलमान नाही…

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Seema Haider : पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि तिच्या चारही मुलांना तिच्या कुटुंबाने आणि शेजाऱ्यांनी तिला पुन्हा स्वीकारणार नाही, असे म्हटले आहे. एका हिंदू पुरुषासोबत राहण्यासाठी तिने पुराणमतवादी मुस्लिम देशातील सामाजिक नियांचे उल्लंघन करण्याचे धाडस केले आहे. ती आता मुसलमान राहिलेली नाही. यासाठी आम्ही तिला बहिष्कृत केले आहे, असे सीमा हैदरच्या पाकिस्तानी नातेवाईकांनी म्हटले आहे. इंडिया टुडेने याचे वृत्त दिले आहे.

पाकिस्तानी नागरिक असलेली सीमा हैदर ही महिला पब्जी खेळादरम्यान उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील सचिन मीना नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली होती. आपल्या नवर्‍याला सोडून ती मुलांना सोबत घेऊन नेपाळमार्गे अवैधरीत्या भारतात आली आहे. याची माहिती मिळताच ग्रेटर नोएडा पोलिसांनी हैदरला इमिग्रेशन कायद्याचे उल्लंघन करून भारतात प्रवेश केल्याबद्दल अटक केली, तर तिला आश्रय दिल्याबद्दल सचिन मीना आणि त्याच्या वडिलांनाही ४ जुलैला अटक करण्यात आली होती.

Seema Haider : सीमाला परत न पाठवल्यास 26/11 सारखा हल्ला पुन्हा करू

सीमा हैदरच्या या कृतीनंतर अनेकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केले. काही भारतीयांनी तिचे समर्थन केले तर काहींनी ती पाकिस्तानची एजंट असल्याचे म्हटले होते. तसेच मध्यंतरी सीमाला पाकिस्तानात परत न पाठविल्यास पुन्हा एकदा 26/11 सारखा भीषण दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेतील हेल्पलाईन क्रमांकावर हा धमकी देणारा मेसेज आला होता. हा संदेश फसवा असण्याची शक्यता आहे. मात्र, पोलिसांनी या धमकीची दखल घेऊन शहरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. तसेच, या धमकीचा अलर्ट राज्य आणि केंद्रातील तपास व गुप्तचर यंत्रणांना देण्यात आला आहे.

सीमा हैदरची नुकतीच जेलमधून सुटका करण्यात आली आहे. मात्र, सीमा आणि तिच्या मुलांसाठी सीमेपलीकडून चांगली बातमी नाही. सीमाच्या शेजारी आणि नातेवाईकांनी स्पष्ट केले की त्यांना ती पाकिस्तानात परत नको आहे. पाकिस्तानात सीमा ज्या ठिकाणी भाड्याच्या घरात राहत होती. त्या घरातील घरमालकाचा १६ वर्षीय मुलगा म्हणाला,"तिने फक्त तिच्या मुलांना परत पाकिस्तानला पाठवायला हवे. ती तिथे राहू शकते. आता ती मुस्लिमही नाही."

Seema Haider : सीमाच्या धाडसाने सगळ्यांनाच भूरळ टाकली

चार मुलांची ही अशिक्षित आई आणि परदेशात काम करणार्‍या पतीची पत्नी यांना पाकिस्तानच्या मोठ्या रूढिवादी समाजात सर्व काही सोडून भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचे धाडस कसे होऊ शकते याची कहाणी तिच्या आजूबाजूच्या प्रत्येकाला भुरळ पाडते.
विशेष गोष्ट म्हणजे सीमा आणि तिचा पती गुलाम हैदर दोघांनी 10 वर्षांपूर्वी पालकांच्या इच्छेविरुद्ध पळून जाऊन प्रेम विवाह केला होता. सध्या सीमा तिच्या मुलांसोबत पाकिस्तानात भिट्टयाबादच्या शेजारी, गुलिस्तान-ए-जौहरच्या मध्यभागी असलेल्या कच्ची आबादीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून भाड्याच्या घरात राहात होती. तर तिचे सासरे तेथूनच काही अंतरावर राहतात, असे घरमालकाचा मुलगा नूर मुहम्मद यांनी स्पष्ट केले.

ज्या ठिकाणी ती राहात होती. ते एका इमारतीत केवळ तीन खोल्या होत्या. तिथे अन्य भाडेकरू देखील राहत होते. सीमाचा नवरा सौदी अरबमध्ये काम करतो. त्यामुळे या ठिकाणी ती मुलांसोबत एकटीच राहत होती. या ठिकाणी आसपासचा परिसर कचरा-गटार दुर्गंधीने भरलेला होता.

सीमाविषयी तिच्या शेजाऱ्यांचे मत

जमाल जाखरानी, या तिच्या आणखी एका वृद्ध शेजाऱ्याने सांगितले की, आम्ही तिला टॅक्सी बोलवताना पाहिले आणि एक दिवस तिची मुले आणि काही पिशव्या घेऊन निघून गेल्या आणि आम्हाला वाटले की ती जेकबाबादला तिच्या गावी जात आहे. पण जवळजवळ एक महिन्यानंतर, जेव्हा आम्ही टीव्ही चॅनेल्सवर तिच्या पलायनाबद्दल ऐकले, तेव्हा आम्हा सर्वांना धक्काच बसला.

इंडिया टुडेच्या माहितीनुसार, अरुंद गल्लीत महिलांशी बोलण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला कारण या भागात बहुतांश आदिवासी पश्तून, सिंधी आणि ग्रामीण भागातील सराईकी लोक राहतात आणि पुरुष त्यांच्या महिलांना अनोळखी व्यक्तींशी बोलू देत नाहीत आणि त्यांना पर्दा पाळायला लावत नाहीत. पण एकाने पाहिले की काही स्त्रिया त्यांच्या खिडकीतून आणि मुख्य दरवाजातून बाहेर डोकावताना काय होत आहे हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

सीमा आणि गुलाम हैदर ज्या जमातीशी संबंधित आहेत त्याच जमातीतील जमालला वाटते की सीमाने आता भारतातच राहणे चांगले आहे. "जर तिने परत येण्याचा विचार केला तर तिला जमाती माफ करणार नाही आणि दुसरे म्हणजे, एका हिंदूसोबत राहण्याच्या तिच्या निर्णयामुळे आता सर्वांनाच राग आला आहे," असे जमाल म्हणाले.

तर मियां मिथू, ग्रामीण सिंधमधील एक उच्च-प्रोफाइल धार्मिक नेता, ज्याने आपल्या सेमिनरीचा वापर करून हिंदू मुलींना इस्लाममध्ये धर्मांतरित करण्यासाठी आणि जो अगदी डाकूंसारखा ओळखला जातो त्याने सीमा परत आल्यास शिक्षा करण्याची उघडपणे धमकी दिली आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT