Latest

Tunisha Sharma : मुलीचे पार्थिव पाहून वनिता शर्मा पडल्‍या बेशुद्ध

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही इंडस्ट्रीतील तुनिषा शर्मा ( Tunisha Sharma ) हिने गेल्या शनिवारी 'दास्तान ए काबुल' मालिकेच्या सेटवरील मेकअप रूममध्ये स्वत: चे जीवन संपवले. या प्रकरणी तुनिषाचा  बॉयफ्रेंड शीझान खान याला पोलिसांनी अटक केली आहे.  तुनिषाच्या मृतदेहावर आज ( दि. 27 ) अत्यसंस्कार होणार आहेत. याआधी तुनिषाचे कुटुंबीय तिच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यास हॉस्पिटलमधील शवागृहात पोहोचले. या वेळी  तुनिषाचा पार्थिव  पाहिल्यानंतर आई वनिता शर्मा जागीच बेशुद्ध झाल्‍या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

२० वर्षाय तुनिषा शर्मा हिचे बॉयफ्रेंड शीझान खानसोबत भांडण झाले होते. यातूनच तिने जीवन संपविल्‍याचे पोलिसांच्‍या प्राथमिक तपासात स्‍पष्‍ट झाले. पोलिसांनी शीझान खान याला अटक केली आहे. दरम्यान,  तुनिषाच्‍या मृत्यूप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

तुनिषाच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यास तिचे कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये पोहोचले. या वेळी तुनिषाची आई वनिता शर्मा मुलीचा पार्थिव पाहून  बेशुद्ध पडल्‍या. त्‍यांना  हॉस्पिटल बाहेर आल्यानंतर चालताही येत नव्‍हते. कुटुबियांनी त्‍यांना आधार दिला होता. तुनिषाच्‍या मृत्‍यूचा त्‍यांना मोठा मानसिक धक्‍का बसला आहे.

हेही वाचा :  

SCROLL FOR NEXT