Latest

SBI चा ग्राहकांना झटका! आजपासून व्याजदरात वाढ, कर्जे महागली, EMI वाढणार

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ग्राहकांना स्वातंत्र्यदिनी झटका दिला आहे. SBI आजपासून कर्जावरील निधीवर आधारित कर्ज दर म्हणजे MCLR (marginal cost of funds based lending rate) मध्ये वाढ केली आहे. हे वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत. SBI च्या या निर्णयामुळे कर्जावरील मासिक हप्ता EMI महागणार आहे. दीर्घ मुदतीची कर्जे MCLR शी जोडलेली असतात. किरकोळ कर्जाच्या दृष्टीकोनातून एक वर्षाचा MCLR महत्त्वाचा मानला जातो. कारण गृह, कार कर्जासारखी बँकेची दीर्घकालीन कर्जे या दराशी जोडलेली असतात.

SBI ने ओवरनाइट ते तीन महिन्यांचा SBI MCLR दर ७.१५ टक्क्यांवरुन ७.३५ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. SBI चा सहा महिन्यांचा MCLR ७.४५ टक्क्यांवरून ७.६५ टक्के, एक वर्षाचा ७.५ टक्क्यांवरुन ७.७ टक्के, दोन वर्षांचा ७.७ टक्क्यांवरून ७.९ टक्के आणि तीन वर्षांचा ७.८ टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर गेला आहे. गेल्या महिन्यात एसबीआयने विविध कालावधीच्या निधी आधारित कर्ज दरांच्या किरकोळ दरात (MCLR) १० बेस पॉइंट्सने वाढ केली होती.

MCLR वाढल्याने गृह, कार आणि पर्सनल कर्जाप्रमाणेच सर्व प्रकारची कर्जे महागणार आहेत. यामुळे गृह कर्जाचा EMI महागणार आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) नुकताच सलग तिसऱ्यांदा रेपो रेट (RBI Monetary Policy) वाढवला आहे. रेपो दर ५० बेस पॉईंट म्हणजे ०.५० टक्क्याने वाढवला आहे. यामुळे रेपो रेट ५.४० टक्क्यांवर पोहचला आहे. यामुळे कर्जे महागली आहेत. २०२२-२३ मध्ये महागाई दर ६.७ टक्के राहण्याचा अंदाज आहे; तर २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत किरकोळ महागाई (सीपीआय) दर ५ टक्के राहण्याचा अंदाज असल्याचे आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांता दास यांनी म्हटले आहे. रेपो रेट सलग तिसऱ्यांदा वाढवल्यामुळे कोरोना संसर्गाच्या आधीच्या स्तरावर पोहोचला आहे.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT