Latest

MP Shrinivas Patil : सातारचे खासदार श्रीनिवास पाटील कोरोना पॉझिटिव्ह

backup backup

सातारा ; पुढारी ऑनलाईन : सिक्कीमचे माजी राज्यपाल सातारा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर कराड येथील एका रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती खासदार श्रीनिवास पाटील यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. (MP Shrinivas Patil)

खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपल्या फेसबुक पेजवरून आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घेत कोरोना चाचणी करावी असे आवाहनही खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले आहे. दरम्यान खासदार श्रीनिवास पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यात सातारा, कराड पुन्हा हॉटस्पॉट

कोरोना संसर्गाचा वेग जिल्ह्यात वाढू लागला आहे. यामध्ये सातारा व कराड तालुक्यात सर्वाधिक बाधित असून यापूर्वीच्या दोन्ही लाटांमध्येही हेच तालुके हॉटस्पॉट ठरले होते. आताही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. बाधितांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने गृहविलगीकरणातच उपचार सुरू आहेत. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेणार्‍यांची संख्या व ऑक्सिजनची मागणी कमी असल्याने
सध्या आरोग्य यंत्रणेवर ताण जाणवत नाही.

जिल्ह्यातील पहिल्या दोन कोरोना जिल्ह्यात सातारा, कराड पुन्हा हॉटस्पॉट लाटांच्या तुलनेत या लाटेत रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे सापडत आहेत. संसर्गाचा वेग 30 टक्क्यांच्या घरात गेला आहे. त्यामुळे धोका कायम आहे. जिल्ह्यात कराड व सातारा तालुक्यात सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून आली आहे. सातार्‍यात बुधवारी 405 तर कराडमध्ये 313 रुग्ण बाधित आढळले आहेत. सर्वाधिक रुग्णसंख्या ही
ग्रामीण भागात आहे. या सर्व रुग्णांवर लक्षणेनिहाय गृहविलगीकरणातच डॉक्टर उपचार करत आहेत. अशा रुग्णांची माहितीही आरोग्य विभाग घेत आहे.

SCROLL FOR NEXT