Latest

सातारा : आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्‍या अन्‌ एकुलत्या एक मुलाने संपवले जीवन

अमृता चौगुले

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातार्‍यातील जिजामाता कॉलनीत राहणार्‍या प्रेम लहू पवार (वय 16, मूळ रा. आसनगाव, ता. सातारा) याने शुक्रवारी आईला फोनवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर घरातच गळफास घेऊन आयुष्य संपवले. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंद झाली असून पोलिस आत्महत्येचे कारण शोधत आहेत.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी, लहू पवार हे मूळचे आसनगाव (ता. सातारा) येथील रहिवासी असून, ते शिक्षक आहेत. सध्या ते सातार्‍यातील जिजामाता कॉलनीत कुटुंबासमवेत राहतात. ते पत्नीला घेऊन आसनगावला शेतीच्या कामासाठी गेले होते. प्रेम हा एकटाच सातार्‍यातील घरी होता. आईचा वाढदिवस असल्याने त्याने शुक्रवारी सकाळी फोनवरुन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शेजारी राहणार्‍या काही जणांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रेमच्या कुटुंबीयांना फोनवरुन माहिती दिली.

मुलाची माहिती मिळाल्यावर आसनगावावरुन आलेल्या आई-वडिलांनी एकुलत्या एक मुलाचा मृतदेह पाहून हंबरडा फोडला. यावेळी उपस्थितांचे डोळेही पाणावले. प्रेम सातार्‍यातील एका महाविद्यालयात इयत्ता 11 वीत शिकत होता. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून प्रेमच्या आत्महत्येच्या कारणाचा ते तपास करत आहेत.

हे ही वाचलं का  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT