बेळगावातून अमेरिकेला पाठविले ७० शिवपुतळे | पुढारी

बेळगावातून अमेरिकेला पाठविले ७० शिवपुतळे

बेळगाव : पुडारी वृत्तसेवा

अमेरिकेत वास्तव्यास असलेला मराठी माणूसही शिवजयंती साजरी करतो. यंदा तर तो आणखी मोठ्याने साजरी करणार आहे. कारण, एकट्या बेळगावातूनच अमेरिकेला 100 शिवपुतळ्यांची मागणी नोंदविण्यात आली असून, 70 पुतळे याआधीच पाठविण्यात आले आहेत. दरवर्षी अमेरिकेत राहणारे मराठी लोक एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. महाराष्ट्राच्या धर्तीवर त्या ठिकाणी शिवजयंती साजरी होत होती. झांजपथक, लेझीम याचे सादरीकरणदेखील होते. मात्र, कोरोनामुळे दोन वर्षे शिवजयंती साजरी करता आली नाही. त्यामुळे आपल्या घरी शिवजयंती साजरी करण्यासाठी अनेकांनी बेळगावातून शिवपुतळ्यांची मागणी केली आहे.

Back to top button