Latest

सातारा: फलटणमध्ये आर्मी इंटेलिजन्सचा मिलिटरीमध्ये भरती करणा-या रॅकेटवर छापा

अमृता चौगुले

सातारा : पुढारी वृत्तसेवा : मिलिटरी मध्ये भरती करतो असे सांगून रॅकेट चालवणाऱ्या फलटण परिसरातील एका अकॅडमी वर आर्मी इंटेलिजन्सने छापा टाकला. सोमवारी रात्री उशिरा पर्यंत ही कारवाई सुरू होती व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, आर्मी मध्ये भरती करतो असे सांगून काही अनेक युवकांची फसवणूक झाली आहे. कागदपत्र, नियुक्ती पत्र खोटी देण्यात आली. ही बाब आर्मी इंटेलिजन्स ला समजल्यानंतर त्याचे कनेक्शन सातारा जिल्ह्यातील फलटणपर्यंत आले आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT