Latest

Kolhapur News | उद्योजक संतोष शिंदे मृत्यू प्रकरण : ‘त्या’ दोघांना ३० जूनपर्यंत कोठडी

दीपक दि. भांदिगरे

गडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा; येथील उद्योजक संतोष शिंदे तिहेरी मृत्यू प्रकरणी (Santosh Shinde Death Case) रविवारी पोलिसांनी संशयित माजी नगरसेविका शुभदा राहुल पाटील (रा. गिजवणे रोड गडहिंग्लज) आणि तिचा साथीदार व अमरावती कंट्रोल रुमकडे कार्यरत असणारा पोलिस अधिकारी राहुल श्रीधर राऊत (रा. निलजी, ता. गडहिंग्लज) यांना रविवारी (दि. २५) विजापूर येथून एलसीबीने अटक केली होती. त्यांना आज (दि. २६) गडहिंग्लज पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता ३० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. (Kolhapur News)

दरम्यान, या संशयितांना न्यायालयात हजर केल्याचे समजताच नागरिकांचा मोठा जमाव न्यायालयाच्या आवारात आला. या ठिकाणी संशयितांचे वकीलपत्र घेण्यास आलेल्या वकिलांसमोर त्यांनी वकीलपत्र न घेण्याबाबत घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मध्यस्थी करत नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

शुक्रवारी मध्यरात्री प्रसिद्ध उद्योजक संतोष यांनी पत्नी व मुलाचा गळा चिरुन स्वतःही जीवन संपवले होते. त्यांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून शुभदा पाटील व राहुल राऊत याने त्यांच्याकडून १ कोटी रुपयांची खंडणी मागितली. याशिवाय पुणे येथील विशाल बाणेकर, संकेत पाटे यांनी ६.५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद गडहिंग्लज पोलिसांत दाखल झाली होती. पोलिसांनी संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. यानुसार काल शुभदा पाटील हिच्या राहुल राऊत यांना बेड्या ठोकल्या होत्या.

दरम्यान, पुणे येथील बाणेकर व पाटे यांच्याशी संबंधित व्यवहारांची देखील चौकशी सुरु आहे. या चौकशीनंतर याबाबतही निश्चित कारवाई करु, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले, पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांनी दिली. (Kolhapur News)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT