Latest

Sanjay Raut Tweet : “आपल्‍या कर्माने मरणार…” संजय राऊत यांचे ट्विट

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी "आमच्यावर आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत." असं ट्विट करत निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये भाजप महाराष्ट्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे. (Sanjay Raut Tweet)

Sanjay Raut Tweet : काय म्हणाले राऊत?

संजय राऊत यांनी भाजपा महाराष्ट्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत ट्विट करत निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की, "आमच्यावर आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत. ते सांगायचे:" जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका". नेमके तसेच घडत आहे. यापुढे देखील बरेच काही घडणार आहे.. जे जे होईल ते पाहत राहावे. जय महाराष्ट्र!

किरीट सोमय्यांवर निशाणा?

संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे; पण त्यांचा रोख हा माजी खासदार व भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांच्यावरही आहे का?, अशीही चर्चा सोशल मीडियावर होत आहे. सोमवारी (दि.१७) भाजपा नेते किरिट सोमय्या यांचाआक्षेपार्ह  व्हिडिओ एका वृत्तवाहिनेने प्रसिद्ध केला. त्यानंतर राज्यात खळबळ माजली. राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं. विरोधकांकडून भाजप व सोमय्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. संजय राऊत यांनी केलेले ट्विट किरिट सोमय्यांवरही निशाणा साधला, अशीही चर्चा साेशल मीडियावर हाेत आहे. 

हेही वाचा  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT