Latest

संजय राऊत यांचा हल्लाबोल, नाच्यांच्या पायात घुंगरू बांधून….

backup backup

दादरा नगर हवेली आणि देगलूरमधील विजय ही २०२४ मधील परिवर्तनाची नांदी आहे, त्यामुळे आज जे नाचे नाचत आहेत त्यांच्या पायात कुठले घुंगरू बांधायचे ते बांधून कसे नाचवतो तेच पहा, असा शिवसेनेचे प्रवक्त खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.

देशात तीन लोकसभा आणि २९ विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने समाधानकारक बाजी मारली आहे. दादरा नगर हवेलीत भाजप नेत्यांची नावे लिहून आत्महत्या करणाऱ्या मोहन डेलकर यांच्या पत्नीने दणदणीत विजय मिळविला आहे. तर देगलूर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे बाजी मारली आहे. या दोन विजयांचा संदर्भ देत राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ते म्हणाले, 'आमच्या कुटुंबावर, घरांवर, नेत्यांसोबत खेळ तुम्ही सुरु केला आहे, त्याचा शेवट आम्हीच करू. महाराष्ट्राबाहेर पहिली जागा जिंकण्याचे काम शिवसेना दादरा नगर हवेलीमध्ये झाले आहे. महाराष्ट्राच्या बाहेर आणि गुजरातच्या सीमेजवळ झालेला हा विजय ऐतिहासिक आहे. देगलूरमधून राजकारणाचा दरवाजा उघडतो असे म्हणतात, तेथे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने आघाडीवर आहेत. ही २०२४ मधील केंद्रातील परिवर्तनाची नांदी आहे. आज जे नाचे महाराष्ट्रात नाचत आहेत त्यांच्या पायात कोणते घुंगरू बांधायाचे आणि त्यांना कसे नाचवायचे हे आम्ही ठरवू, असा हल्लाबोलही केला आहे. तसेच 'संजय राऊत सांगत आहेत ते लिहून ठेवायचे. आमच्या कुटुंबावर, घरांवर, नेत्यांसोबत खेळ तुम्ही सुरू केला आहे त्याचा शेवट आम्हीच करु, असे आव्हानही त्यांनी दिले. ( संजय राउतांचा हल्लाबोल )

संजय राऊत यांचा हल्लाबोल : तपास यंत्रणा तुमच्या बापाची आहे का?

अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर आहे, असे मेसेज व्हायरल होत असल्याबाबत राऊत यांना विचारले असता 'केंद्री तपास यंत्रणा तुमच्या बापाच्या मालकीची आहे का? तुम्ही कधी तुरुंगात जाणार आहात त्या तारखा आम्ही सांगू. पण या पातळीवर आम्ही नाही उतरणार. हे बोंबलणारे भाजपाचे मूळ लोक नाहीत. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार यांना आम्ही उत्तरे देऊ. बाहेरून आलेल्या नाच्यांना आम्ही उत्तर देणार नाही. भाजपासोबत आमचा संबंध जुना होता आणि आहे. आम्हाला भाजपा, संघ परिवार काय आहे हे माहिती आहे.'

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT