पुढारी ऑनलाईन डेस्क : गंगूबाई काठियावाडीनंतर बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) नवी वेब सीरिज घेऊन येत आहेत. हिरामंडी (Heeramandi) असे या आगामी वेब सीरीजचे नाव आहे. शनिवारी (दि. १८) या सिरीजच्या फर्स्ट लूकचा टिझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात एकूण सहा अभिनेत्रींच्या अभिनयाची मेजवानी असणार आहे. रिलीझ टिझरमध्ये या तीघींचा रॉयल लूक दिसून येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमुळे हिरामंडी वेब सिरीजची जोरदार चर्चा आहे.
हिरामंडीचा पहिला टिझर-व्हिडिओ नेटफ्लिक्सने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सहा अभिनेत्रींचा पहिला लूक पहायला मिळाला. मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, संजीदा शेख आणि शर्मीन सेगल अशी या सहा अभिनेत्रींची नावे आहेत. हिरामंडी मधील यांचा लूक पाहिल्यानंतर आता चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. संजय लीला भन्साळी यांनी बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक क्लासिक चित्रपट दिले आहेत.
याआधी चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात होते. त्यानंतर आता फर्स्ट लूक समोर आल्यानंतर आता चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. नेटफ्लिक्स आणि भन्साळी प्रोडक्शन यांच्याकडून टीझरबाबतची पोस्ट शेअर करत चित्रपटाबाबत थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. या पोस्टवर लिहीले आहे की, एक वेगळा काळ, वेगळे युग, संजय लीला भन्साळी यांनी तयार केलेले वेगळे जादूई जग. त्याचा एक भाग होण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. हीरामंडीच्या सुंदर दुनियेची एक झलक सादर करत आहे.. अशा आशयाचे हे टीझर आहे. लवकरच हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येईल अशी माहिती या पहिल्या टीझरमधून मिळाली आहे.
हेही वाचा