Kangana Ranaut: कंगनाचा ठाकरेंवर निशाणा; ‘परमेश्वर त्यांनाच शिक्षा देतो, जो…’ | पुढारी

Kangana Ranaut: कंगनाचा ठाकरेंवर निशाणा; 'परमेश्वर त्यांनाच शिक्षा देतो, जो...'

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे बोधचिन्ह मिळाल्यानंतर राजकारणात मोठे घमासान सुरु आहे. यादरम्यान, अभिनेत्री कंगना रानौतने (Kangana Ranaut) केलेल्या ट्विटची चर्चा होत आहे. (Kangana Ranaut) कंगनाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. यानंतर कंगनाने आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

कंगनाने ट्विटमध्ये काय म्हटलं?

कंगनाने ट्विट करत लिहिलंय, “देवतांचे राजा म्हणजेच इंद्रालादेखील दुर्व्यवहार केल्यानंतर शिक्षा मिळते. ते तर केवळ एक नेते आहेत, ज्यांनी माझं घर तोडलं, तेव्हा मला वाटलं की, त्यांचे वाईट दिवस सुरू होतील. एका महिलेचा अपमान करणाऱ्यांना परमेश्वर शिक्षा देतो. आता ते पुन्हा कधीच नाही उभारू शकत.”

कंगना रनौतने उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कंगनाच्या घरातील एक भाग मुंबई पालिकेच्या अतिक्रमण विभागाने तोडला होता. त्यावेळीही कंगनाने उद्धव ठाकरेंना संबोधित करताना म्हटलं होतं-‘आज माझं घर तोडलं होतं, उद्या तुमचे घमंड तुटेल.’

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ आलं आहे. उद्धव ठाकरेंना मोठा धक्का लागला आहे. दरम्यान, या निर्णयावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर मोठी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात निदर्शने केली. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाहेर येऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली.

Back to top button