Latest

Women’s World Cup 2022 : बुमराहची पत्नी संजना गणेशनने केले युक्रेनचे समर्थन?

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहची ( jasprit bumrah ) पत्नी संजना गणेशन ( sanjana ganesan ) महिला विश्वचषकमध्ये ( Women's World Cup 2022 ) माध्यमांसाठी सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडत आहे. विश्वचषकातील एका सामन्यादरम्यान तिने युक्रेनच्या झेंड्यासारखाच ड्रेस परिधान केला होता. यानंतर संजना युक्रेनला सपोर्ट करतेय का? असा सवाल चाहत्यांनी केला आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला करून युद्ध छेडले आहे. यात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. अनेक खेळाडू आणि देश रशियावर बंदी घालत आहेत. मात्र, भारत या संपूर्ण प्रकरणावर तटस्थ असून कोणत्याही देशाला पाठिंबा दिलेला नाही.

संजना गणेशनने तिच्या पेहरावावर भाष्य केलेले नाही आणि युक्रेनच्या समर्थनार्थ घातल्याचे उघडपणे मान्य केले नाही. मात्र, तिचा ड्रेस पाहून संजनाने युक्रेनच्या समर्थनार्थ हे कृत्य केल्याचा अंदाज लोक बांधत आहेत.

नासिर हुसेनसोबतचा फोटो होतोय व्हायरल ( Women's World Cup 2022 )

इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन ( nasir hussain ) सोबत संजनाचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने युक्रेनच्या झेंड्यासारखा ड्रेस परिधान केला आहे. लोकांनी नासिर हुसैन यांची पुतीनशी तुलना केली आहे. या सोबतच पुतिन यांच्यासमोर युक्रेनचा ध्वज लावणे हे धाडसी पाऊल असल्याचे गंमतीने म्हटले आहे.

कोण आहे संजना गणेशन ( Women's World Cup 2022 )

संजनाने 2014 मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकला होता आणि ती MTV च्या लोकप्रिय शो स्प्लिट्स व्हिलाच्या सातव्या सीझनचा भाग होती. गेल्या काही वर्षांपासून संजना क्रिकेट प्रेझेंटरच्या भूमिकेत आहे. क्रिकेट व्यतिरिक्त संजनाने अनेक बॅडमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांमध्ये सूत्रसंचालकाची भूमिका बजावली आहे.

संजना ही मॅनेजमेंट गुरू गणेशन रामास्वामी यांची मुलगी आहे. रामास्वामी हे पुण्यातील अल्ना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसचे संचालक आहेत. संजनाने सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे येथून सॉफ्टवेअर इंजिनिअरची पदवी घेतली आहे. इंजिनीअरिंग केल्यानंतर तिने मॉडेलिंगच्या दुनियेत प्रवेश केला.

संजन गणेशन यांनी स्पोर्ट्स अँकर म्हणून 2016 मध्ये स्टार स्पोर्ट्समध्ये प्रवेश केला. ती 'मॅच पॉइंट', 'नाईट क्लब' आणि चीकी सिंगल्स सारख्या लोकप्रिय शोसाठी अँकरिंग करताना दिसली. संजना तीन वर्षांपासून आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सशी (केकेआर) संबंधित होती.

संजना आणि बुमराहची लव्हस्टोरी क्रिकेटच्या मैदानापासून सुरू झाली. माध्यमांच्या वृत्तानुसार, दोघे इंडियन प्रीमियर लीग दरम्यान भेटले होते आणि नंतर ते जवळचे मित्र बनले. पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात आणि लग्नात झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT