Latest

सांगली : विट्यात दोन चिमुरड्यांसह महिलेची आत्महत्या

अमृता चौगुले

विटा, पुढारी वृत्तसेवा :  पती बरोबर झालेल्या किरकोळ वादातून विट्यात एका महिलेने दोन लहान मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. सोनाली बिहुदेव हात्तेकर (वय २६,रा. शाहूनगर, विटा) असे या महिलेचे नाव असून सोबत चार वर्षांची मुलगी सोनाली आणि एक महिन्याचे चिमुकले बाळ आहे. ही घटना आज सोमवारी दुपारी दोन वाजता उघडकीस आली.

विटा ते नेवरी रस्त्यावर शिवाजीनगरातील ओढ्याजवळ एका विहिरीत ४ वर्षे वयाची मुलगी आणि ३ महिन्याच्या बाळासह एका महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. सुरुवातीला ही आत्महत्या की अपघात याबाबत चर्चा सुरू होती. दरम्यान या घटनेबद्दल विटा पोलिसांमध्ये नोंद झाली.

या बाबत विटा पोलिसांनी सांगितले की, विटा नेवरी रस्त्यालगत शाहूनगर उपनगरामध्ये ढवळेश्वर तलावाकडे जाणाऱ्या ओढ्याच्या पात्रात एक जुनी विहीर आहे. या विहिरीत आज सोमवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना महिलेचा मृतदेह तरंगताना पाहिला. त्‍यानंतर लोकांनी जवळ जाऊन पाहिले तर त्या ठिकाणी आणखी दोन मृतदेह आढळले. यामध्ये एक लहान मुलगी आणि एक बाळ असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून तेथील नागरिकांनी विटा पोलिसांना सांगितले. त्‍यानंतर ही महिला शाहूनगर येथीलच रहिवाशी असल्याचे सांगण्यात आले.

विहीर जुनी असल्याने कठडा आणि निसरडी वाट असल्याने आत उतरणे अत्यंत कठीन होते. त्‍यामूळे पोलिसांनी क्रेनने  तिन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. तिचे पती बिहुदेव हा विट्यातील एका हॉटेल मध्ये काम करतात. आज सकाळी त्यांचा पत्नी सोनालीशी वाद झाला होता. या वादातून हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान,बिहुदेव हातेकर यांना आई-वडील नाहीत तसेच सोनालीलाही आई वडील नाहीत अशी माहिती ही विटा पोलिसांनी दिली आहे.

हे ही वाचलं का  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT