Latest

sangli rain update : कृष्णेची पाणी पातळी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता

backup backup

सांगली; पुढारी वृत्तसेवा : sangli rain update : कोयनेतून आज (ता.२३) दुपारपर्यंत ५० हजार क्युसेस विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कृष्णा नदीतील पाणी पातळी सध्याच्या पाणीपातळी पेक्षा दहा ते बारा फुटाने अधिक वाढू शकते.

नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक तेथे तत्काळ स्थलांतरण सुरू करावे, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिला. सांगलीमध्ये (sangli rain update)आयर्विन पूल येथे पाणीपातळी ५० ते ५२ फुटापर्यंत वर जाऊ शकते.

सखल भागातील नागरिकांनी तसेच नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे. नदीपात्रात कोणीही जाऊ नये, यासाठी प्रशासनाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.

सांगली जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडला. कोयना, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी सुरू आहे. दिवसभरात तब्बल दहा फूट पाणीपातळी वाढल्याने कृष्णा, वारणा नद्यांना पूर आला आहे.

अनेक बंधारे, पूल पाण्याखाली गेले आहेत. काही गावांचा संपर्क तुटला आहे.

महापुराच्या धास्तीने काही गावांत स्थलांतर सुरू झाले आहे. कोयना व चांदोली धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

पाऊस व धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे शुक्रवारी दोन्ही नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडणारआहे.

सायंकाळपर्यंत पाणी सांगली शहरासह नदीकाठच्या अनेक गावांत घुसण्याचा धोका आहे.

जिल्ह्यात व पाणलोट क्षेत्रात गेले दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील पाण्याची पातळी वाढते आहे.

गेल्या २४ तासात सरासरी ५९.६ मिमी पावसाची नोंद झाली. शिराळा तालुक्यात १५४.३मिमी पाऊस पडला.

मिरज तालुक्यात ३६.२, जत तालुक्यात ११.१, खानापूर-विटा तालुक्यात २५.२, वाळवा-इस्लामपूर तालुक्यात ७५.७, तासगाव तालुक्यात ३५.६, आटपाडी तालुक्यात ७.४, कवठेमहांकाळ तालुक्यात १९.८, पलूस तालुक्यात ६०.३, कडेगाव तालुक्यात ५९.६मिमी असा उच्चांकी पाऊस झाला.

पूर नियंत्रण कक्ष,

सांगली पाटबंधारे विभाग सांगली.
दिनांक -23/07/2021
8.00PM

पाणी पातळी
(धोका पातळी/आत्तची पातळी) (फूट इंचामध्ये)

1)कृष्णा पूल कराड-(55.0)/40'5"
2)भिलवडी पूल – (53 )/49'0"
3)आयर्विन- (45)/39'3"
4)राजापूर बंधारा सांगली-(58)/41'3"

विसर्ग (क्यूसेक्स मध्ये)

1)कोयना धरण- 11667
2) वारणा धरण- 25,230
3)अलमट्टी धरण- 117428
4) कृष्णा पूल कराड- 135819
5) आयर्विन पूल -94400
6) राजापूर बंधारा- 121875

इटकरे :पुढारी वृत्तसेवा सलग तीन दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे वारणा नदीला पूर आला असून कणेगाव, भरतवाडी या गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे ग्रामस्थ आपापल्या सोयीप्रमाणे स्थलांतरित होऊ लागले आहेत.

वारणा काठावरील शेती पाण्याखाली गेली असून पाण्याची पातळी गतीने वाढत आहे. कणेगाव येथील म्हसोबा मंदिराला पाण्याचा वेढा पडला आहे.

अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. विठ्ठल मंदिर जलमय झाले आहे. पाण्याची पातळी वाढेल तशी २०१९ ची पूर परिस्थिती लक्षात घेऊन अनेक कुटुंबे स्थलांतरित होऊ लागले आहेत. तर नदीकाठावरील काही शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली आहेत.

पाहा फोटोज : कार्टून लुकमध्ये मराठी अभिनेत्री

[visual_portfolio id="11817"]

SCROLL FOR NEXT