पुढारी ऑनलाईन डेस्क : सांगली लोकसभा मतदार संघात विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवत आहे. त्यामुळे तिरंगी होत असलेल्या या निवडणुकीत रंग चढू लागला आहे. उमेदवारांनी प्रचारासाठी पायाला भिंगरी बांधली आहे. मॉर्निंग वॉकवेळी उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. यावेळी महाविकास आघाडीतून ठाकरे गटाकडून मैदानात उतरलेले उमेदवार चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील आमने सामने आले. यावेळी दोघे स्मितहास्य करून आपल्या प्रचारासाठी निघून गेले. Sangli Lok Sabha
शहरातील बापट मळा परिसरात मतदारांशी संवाद साधताना विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील आमनेसामने आले. यावेळी दोघांनी विचारपूस करून हस्तांदोलन केले. Sangli Lok Sabha
विशाल पाटील प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणूक झाल्यानंतर काँग्रेस नेते व माजी मंत्री वि्श्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. मी पक्षविरोधी काम केलेले नाही. काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहे. काँग्रेसवर अन्याय झाल्याने कार्यकर्ते संतप्त आहेत. मी कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे. मी पक्षाच्या विचाराविरोधात गेलेलो नाही. मी कोणतेही नियम तोडलेला नाही. मला लेखी स्वरूपात कोणतेही आदेश आलेले नाहीत.
काँग्रेस अडचणीत असताना आमच्या घराण्यांने पक्षासोबत राहून काम केले आहे. वसंतदादांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदार, खासदार निवडून येत होते. राज्यात एकहाती सत्ताही वसंतदादांनी आणली होती.
त्यामुळे अशी कोणतीही कारवाई करण्यापूर्वी पक्षाने विचार करावा. माझ्यावरील कारवाईच्या पत्रावर सही करणाऱ्याचे कॉन्ट्रीब्युशन पाहावे. ते आमच्या घरण्यापेक्षा मोठे आहे का ? हे पाहावे. आणि त्यानंतर सही करावी, असा सुचक इशाराही विशाल पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, विशाल पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा