Latest

सांगली पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; ७ पिस्‍तुलांसह १७ काडतुसे जप्त, ६ जणांना अटक

निलेश पोतदार

सांगली ; पुढारी वृत्‍तसेवा कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्‍या आहेत. त्यानुसार सांगली पोलिसांनी रविवारी पहाटे सांगली, मिरज शहरात कोंबिंग ऑपरेशन राबविले. यावेळी सांगली, मिरज शहरातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एकूण सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 7 पिस्तूल, 17 जिवंत काडतुसे, 228 नशेच्या गोळ्या आणि गांजा असा 9 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्‍या सहा गुन्हेगारांपैकी चार गुन्हेगार हे सराईत आहेत. त्यांच्यावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. अवैध शस्त्रे, अंमली पदार्थ, नशेच्या गोळ्या, गांजा बाळगणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणला यश आले आहे.

तसेच, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील म्हैसाळ येथे महाराष्ट्र पोलिसांकडून तर कागवाड येथे कर्नाटक पोलिसांकडून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कागवाड परिसरात निमलष्करी दलाच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आल्‍या आहेत. महाराष्ट्र- कर्नाटकात ये- जा करणाऱ्या प्रत्येक गाडीची कसून तपासणी करण्यात येत आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT