Latest

Samruddhi Highway : समृद्धी महामार्ग तांत्रिकद़ृष्ट्या निर्दोषच; रस्ते विकास महामंडळाचा दावा

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  समृद्धी महामार्ग हा तांत्रिकद़ृष्ट्या निर्दोष महामार्ग आहे. हा महामार्ग उभारताना सुरक्षेच्या आंतरराष्ट्रीय मानकांचे अवलंब करण्यात आला आहे. शिवाय, अन्य महामार्गांवरील अपघातांची संख्या पाहता समृद्धी महामार्गावर कमी अपघाताच्या घटना घडल्याचा दावा रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात येत आहे. वाढत्या अपघातांमुळे विरोधकांकडून समृद्धी महामार्गावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, 'एमएसआरडीसी'ने मात्र वाहनचालकांकडे अंगुलीनिर्देश केला आहे. (Samruddhi Highway)

    संबंधित बातम्या : 

वाहतुक पोलिसांच्या सूचनेनंतर 'एमएसआरडीसी'ने सुरक्षेचे अन्य उपायही केले आहेत. समृद्धी महामार्गावर 'हायवे हिप्नॉटिस' टाळण्यासाठी प्रत्येक दहा किलोमीटरवर रंगीबेरंगी पताके लावण्यात आले आहेत. तर, 25 किलोमीटरवर 'रंबलर' प्रकारचे गतिरोधक उभारण्यात आले आहेत. या रंबरल पट्ट्यांवरून वाहन गेल्यानंतर होणार्‍या कंपनांमुळे चालक सावध होतात. ताशी 150 किलोमीटर वेगाने वाहने चालविता यावीत यादृष्टीने समृद्धी महामार्गाची उभारणी करण्यात आली आहे. महामार्गाची तशी क्षमता असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून वेगमर्यादा कमी ठेवण्यात आली आहे. (Samruddhi Highway)

SCROLL FOR NEXT